समाजात अध्यात्म रुजवणारी दीदी विसावली – आ. किशोर जोरगेवार
आमदार किशोर जोरगेवार यांनी वाहिली राजयोगीनी ब्रह्यकुमारी कुसुम दीदी जी यांना श्रध्दांजली
आमदार किशोर जोरगेवार यांनी राजयोगीनी ब्रह्यकुमारी कुसुम दिदीजींच्या पार्थिवाचे अंतिम दर्शन घेत त्यांना श्रध्दांजली अर्पण केली. राजयोगीनी ब्रह्यकुमारी कुसुम दीदीजी यांनी चंद्रपूरात कला एवं संस्कृतीच्या माध्यमातून समाजाला अध्यात्माचे धडे दिले. एखाद्याला त्याच्या वृत्तीमध्ये शारीरिक ते आध्यात्मिक बदल करण्यास प्रवृत्त करणे, प्रत्येक आत्म्याला शांती आणि वैयक्तिक प्रतिष्ठेची खोल सामूहिक जाणिव निर्माण करण्यास मदत करण्याचे काम त्यांनी या केंद्राच्या माध्यमातून केले. आज त्यांच्या जाण्याने समाजात आधात्म रुजवणारी दीदी विसावली आहे. अशी भावना यावेळी आमदार किशोर जोरगेवार यांनी शोक संदेशात व्यक्त केली आहे.
वयाच्या 67 व्या वर्षी राजयोगीनी ब्रह्यकुमारी कुसुम दीदीजींचे निधन झाले. त्यांचे पार्थिव अंतिम दर्शनाकरीता कला एवं संस्कृती केंद्रात ठेवण्यात आले होते. यावेळी अनेक मान्यवरांनी त्यांच्या पार्थिवाचे अंतिम दर्शन घेत त्यांना श्रध्दांजली अर्पण केली. ब्रह्याकुमारी कुसुम दीदी यांनी 1972 ला कला एवं संस्कृती अध्यात्म केंद्राची स्थापना केली. तेव्हा पासून या माध्यमातून आध्यात्मतेचा प्रसार करत होत्या. येथे राजयोगाचा अभ्यास केल्या जायचा. धैर्य, क्षमा करण्याची क्षमता आणि एकतेकडे नेण्याचे प्रबोधन या केंद्राच्या माध्यमातून केले जात होते. मात्र आज त्यांच्या निधनाने अध्यात्म क्षेत्राचे नुकसान झाले असल्याची शोक संवेदना आमदार किशोर जोरगेवार यांनी व्यक्त केली आहे.