देवाडा येथे पशुवैद्यकीय दवाखाना इमारतीचे लोकार्पण
जिल्हा वार्षिक योजनेतून 28 लक्ष रुपये निधी ; सुनिल उरकुडे यांच्याहस्ते लोकार्पण
राजुरा : तालुक्यातील देवाडा येथे पशुवैद्यकीय दवाखाना इमारतीचे कृषी व पशुसंवर्धन सभापती सुनिल उरकुडे यांच्या हस्ते नुकतेच लोकार्पण पार पडला. काही महिन्यांपूर्वी येथील ग्रामवाशियांनी सभापती सुनिल उरकुडे यांच्याकडे पशुवैद्यकीय दवाखाना इमारतीसाठी निधी उपलब्ध करुन देण्याची मागणी केली होती, ग्रामवासीयांची मागणी लक्षात घेता जिल्हा परिषदेच्या वार्षिक योजनेतून पशुवैद्यकीय दवाखाना इमारतीसाठी एकूण २८ लक्ष रुपयांचा निधी उपलब्ध करुन दिला. यावेळी सुनील उरकुडे यांनी सांगितले की, पक्ष मोठा नसून सामान्य जनता श्रेष्ठ आहे, पक्षाकरिता लोक नसून लोकांकरिता पक्ष आहे, आणि जनतेची कामे करणे माझे आद्य कर्तव्य समजून ग्रामीण भागातील जनतेच्या सेवेत नेहमीच प्रयत्नशील राहू असे प्रतिपादन सभापती उरकूडे यांनी केले.
लोकार्पण सोहळ्याप्रसंगी कार्यक्रमाचे उद्घाटक चंद्रपूर जिल्हा परिषदेचे कृषी व पशुसंवर्धन सभापती सुनिल उरकुडे, कार्यक्रमाचे अध्यक्ष राजुरा पंचायत समिती सभापती मुमताज अब्दुल जावेद, प्रमुख पाहुणे म्हणून पंचायत समिती सदस्य सुनंदा डोंगे, पशुवैदयकीय अधिकारी डॉ झील्लेवार , साहेब धांडे मॅडम, देवाडा येथील सरपंच लक्ष्मीबाई रघुपती पंधरे, उपसरपंच अब्दुल जावेद अस्फक मजीद, भीमराव अत्राम, सुगंधा कुमरे, मंजुषा अन्मुलवर, श्रीनिवास मंथनवार, व बहुसंख्य ग्रामवशियांची उपस्थिती होती.
परिसरातील गावांमध्ये जनावरांच्या आजारांचा मोठा प्रश्न निर्माण होत असल्याने देवाडा येथे पशुवैद्यकीय दवाखान्याची अत्यंत आवश्यकता होती. इमारतीसाठी निधी उपलब्ध करुन दिल्याबद्दल देवाडा ग्रामवशियांनी सभापती उरकुडे यांचे आभार मानले.