महात्मा गांधी रोजगार हमी योजने अंतर्गत थकीत मानधन तातडीने ग्राम रोजगार सेवकांना द्या…!
मुख्य कार्यकारी अधिकारी यांना संवर्ग विकास अधिकाऱ्यांमार्फत निवेदन सादर…
कोरपना : महात्मा गांधी रोजगार हमी योजने अंतर्गत दिनांक १६ मार्च २०२१ मे ३१ मार्च २०२२ तसेच ऑक्टोंबर २०२१ ते २०२२ पर्यंत चे थकीत मानधन मिळण्याबात जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांना संवर्ग विकास अधिकारी दिलीप बैलनवार यांच्या मार्फत निवेदन देण्यात आले.
महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना अंतर्गत ग्रामपंचायत स्तरावर ग्रामरोजगार सेवकांना मागील ६ महिन्यापासून मानधन तथा २ वर्षापासूनचा प्रवास भत्ता व अल्पोहार भत्ता मिळाला नसून थकीत मानधन व भत्ता तातडीने देण्यात यावा, अशी विनंती निवेदनातून करण्यात आली. याबाबत तालुक्यांतील सर्व ग्राम रोजगार सेवक यांची सभा आयोजित करण्यात आली होती. त्या सभेच्या अनुषंगाने सदर मागणी मंजूर न झाल्यास काम करणारे रोजगार दिनांक २१ मार्च २०२२ पासून काम बंद आंदोलन करण्याचे ठरविले. याबाबत ग्राम रोजगार सेवक कर्मचारी संघटना तालुका कोरपना यांच्या कडून तहसीलदार वाकलेकर यांनाही निवेदन देण्यात आले. सदर निवेदनाचा विचार करून मागणी मंजूर व्हावी अशी विनंती सर्व ग्राम रोजगार सेवक यांच्याद्वारे करण्यात आली.
यावेळी ग्राम रोजगार सेवक कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष अरविंद लक्ष्मण दुर्गे, उपाध्यक्ष आतिष पिदुरकर, सचिव रविंद्र आत्राम, सहसचिव कुमारी संध्या पायपरे, कोषाध्यक्ष दत्तूजी काशीपेट्टा तसेच सर्व सदस्य प्रवीण भोयर, सम्यक पाटील, स्नेहा आत्राम, मिनाक्षी मंडाळि, लिलाबाई आस्वले, विकास सोयाम, वैभव चौहाण, मंगेश सिडाम, रामा पेंदोर, उमेश पेंदोर यांच्यासह माधव कुळमेथे, गुणवंत माथुलकर, रामू येडमे, विलास सिडाम, सुरज कुळमेथे, अनिल वाघोडे, दापेश्र्वर चाटोरे, शुभम पत्रकार, नितीन चिकाटे, प्रशील काशिपेठे आदी रोजगार उपस्थित होते.