‘खिर्डी येथील ताज दर्गा’ लोकप्रतिनिधी नी लक्ष देण्याची गरज
भक्त निवास व्यवस्था करण्याची अनेक भाविक भक्तांनी व्यक्त केल्या भावना
कोरपना/प्रवीण मेश्राम : अनेक वर्षापासून प्रचलित असलेला खिर्डी येथील दर्गा येथे मोठ्या संख्येने भाविक भक्त येतात. दर्गा चे दर्शन घेण्याकरिता साठी संपूर्ण महाराष्ट्रातून जनता याठिकाणी येते. पण या ठिकाणी एकही मुक्कामी भक्तनिवास नाही. प्रत्येक वर्षी याठिकाणी हजरत बाबा ताजुद्दीन यांच्या उर्स उत्सव असतो. भाविक भक्त दुरून आलेले असतात पण त्यांना राहण्यासाठी जागा नसल्यामुळे त्यांची गैरसोय होते.
मोहरम काळात मोठ्या प्रमाणात उत्सव केल्या जातो. आपल्या मनोकामना या खिर्डी येथील दर्गा मध्ये पूर्ण होतात. यासाठी दूर दूर चे भक्त याठिकाणी येतात.
खीर्डी हे एक छोटेसे गाव असून गडचांदूर पासून दोन किलोमीटर अंतरावर असलेले गाव आहे. यात आपल्या मनोकामना पूर्ण होण्यासाठी येथे येतात. येथील सेवक त्यात दर्गा ची मनोभावे सेवा करतात पण त्यांची एकच मागणी आहे की मोठ्या प्रमाणात या ठिकाणी येणाऱ्या भाविकांच्या राहण्यासाठी जागा उपलब्ध करून द्यावी.
यासाठी येथील आमदार व स्थानिक लोकप्रतिनिधी लक्ष द्यावे. यासंदर्भात अनेक विनंती अर्ज ह्या संस्थेमार्फत दिली गेली पण आज पावेतो यावर कोणतीही दखल घेतली गेलेली नाही. भाविक भक्तांना राहण्यासाठी भक्त निवास अत्यंत महत्त्वाचे आहे. येथील सेवक प्रतिनिधी शी बोलतांना म्हटले आहे.