ब्राह्मणवाडा विविध कार्यकारी वर राष्ट्रवादी पुन्हा….
अहमदनगर
संगमनेर/प्रतिनिधी, १४/३/२०२२
अकोले तालुक्यातील ब्राह्मणवाडा विविध कार्यकारी सोसायटी वर पुन्हा एकदा महा विकास आघाडी ने सत्ता प्रस्तापित केली असून , देवराम गायकर , भारत आरोटे ,प्रशांत फलके प्रणित शेतकरी सहकारी मंडळाने विरोधकांचा मोठ्या फरकाचा मतांनी पराभव केला आहे. काल या संस्थेची निवडणूक शांतपूर्ण वातावरणात पार पडली, सुमारे ८१.५२% विक्रमी मतदान सकाळी ८ते ४ वाजे पर्यंत झाले. मतदान करण्यास मतदारांचा मोठा उत्चाह दिसून आला.मुंबई ,पुणे ,कल्याण परिसरातून मोठा कामगार वर्ग या मतदान प्रक्रियेत सामील झाला होता. संस्थेवर लादलेली निवडणूक अनेकांना मान्य नव्हती,याची प्रचिती या वेळी दिसून आली. दोन्ही ही गट सीताराम गायकर पाटील यांना मानणारे गट आहेत. पण शेतकरी सहकार पॅनल ने महा विकास आघाडी या बॅनर वर निवडणूक लढवली व मतदारांनी मोठा विश्वास सहकार पॅनल वर दाखवला.शेतकरी सहकार मंडळाचे नेतृत्व माजी सरपंच देवराम गायकर , भारत आरोटे, किसनराव हांडे, प्रशांत फलके यांनी केलं. या निवडणुकीत शेतकरी सहकार चे सर्व उमेदवार सुमारे १२५ ते १३० मतांच्या फरकाने विजयी झाले, यात विद्यमान अध्यक्ष पोपट हांडे, धोंडीबा चव्हाण , भगवान गाजरे , योगेश आरोटे , सुदाम शिंदे, वणाभाऊ फलके, सुरेश गायकर , जाधव यांचा समावेश आहे. दोन महिलांची या आगोदर बिन विरोध निवडणूक झाली होती. विजयी उमेदवारांचे देवराम गायकर, भारत अरोटे, ॲड. किसन राव हांडे, यशोमंदिर चे अध्यक्ष बाबुराव गायकर, ॲड. अशोक गायकर, ज्ञानेश्वर गायकर, सचिन नरवडे, पोपट पावडे, गंगाराम गायकर, प्रशांत फलके, निलेश गायकर आदींनी अभिनंदन केले आहे. या विविध कार्यकारी सहकारी सोसायटी ची निवडणूक सुमारे वीस वर्षानंतर झाली आहे. देवराम गायकर, भारत आरोटे यांच्या नेतृत्वावर जनतेने पुन्हा एकदा विश्वास दाखवला आहे. धोंडीबा चव्हाण यांनी दोन ठिकाणी विजयी मिळवला असून भटक्या विमुक्त जमाती ची जागा रिक्त आहे. बेलापूर, बदगी, जांभळे, कळंब, आदी गावातून अनेक लोक मिरवणुकीत सामील झाले होते. या वेळी युवा कार्यकर्ते यांचे विशेष आभार निलेश गायकर यांनी व्यक्त केले.