आजही जोपासतात आदिवासी परंपरागत संस्कृती
विवाह सोहळ्यात संस्कृतीचे दर्शन ; माजी आमदार निमकर यांनी वधू-वरांना दिला आशीर्वाद
राजुरा : कोणत्याही समाजाच्या संस्कृतीचा वारसा मागील पिढीकडून पुढील पिढीकडे देण्यासाठी विविध सण, उत्सव व कार्यक्रम हे साधन आहे यांच्या माध्यमातून पारंपरिक संस्कृतीचे दर्शन होत असून ती टिकून रहाते, अशीच जिवती तालुक्यातील अतिदुर्गम व डोंगराळ आदिवासीबहुल घारपणा येथील प्रतिष्ठित गेडाम परिवारातील रामराव व येरमीयेसापूर या गावातील कुमरे परिवारातील विवाह सोहळ्यात आदिवासींच्या परंपरागत संस्कृतीचे दर्शन अनेकांना घेता आले.
कुमरे परिवारातील सावित्रा यांचा वैवाहिक सोहळा ७ मार्च रोजी आदिवासी संस्कृतीचे जतन करून रुढी परंपरेनुसार व अत्यंत शिस्तबध्द पद्धतीने शेकडो समाजबांधव, आप्तेष्ठ व मित्रपरिवाराच्या उपस्थितीत पार पडला.
या देखण्या विवाह समारंभाला राजुराचे माजी आमदार सुदर्शन निमकर सहकाऱ्यांसोबत उपस्थित राहून शुभाशीर्वाद दिले. या सोहळयाला विमाशिसंचे जिल्हाध्यक्ष केशव ठाकरे, जिवती पं. स. चे माजी सभापती भीमराव मेश्राम, जिवती नगर पंचायतच्या नगरसेविका सतलु जुमनाके, माजी सरपंच नामदेव जुमनाके, बाजीराव वलका, मारु आत्राम, सोनेराव पेंदोर, भीमराव सिडाम, माजी सरपंच हनमंत कुमरे, महादेव सोयाम, शामराव गेडाम, केशव कुमरे, बळीराम शेळके, ध्रुपदा मरस्कोल्हे यांच्यासह प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते. याप्रसंगी मान्यवरांचा गेडाम व कुमरे परिवाराच्या वतीने रीतिरिवाजानुसार भेटवस्तू देऊन सत्कार करण्यात आला.