तारसा (बुज) येथे सावित्रीबाई फुले यांना आदरांजली
गोंडपिपरी– गोंडपिपरी तालुक्यातील तारसा बुज. येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत आज १० मार्च २०२२ रोज गुरुवार ला सावित्रीबाई फुले यांची पुण्यतिथी कार्यक्रम पार पडला.
सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. सावित्रीबाई फुले यांच्या जन्मपरीचय व त्यांनी केलेल्या कार्यविषयावर माहिती सांगताना मुख्याध्यपक दिनेश देवाळकर म्हणाले की, सावित्रीबाई फुले यांचा जन्म ३ जानेवारी १८३१ मध्ये नायगाव जिल्हातील सातारा येथे झाला त्या भारताच्या पहिल्या महिला शिक्षिका तथा एक कर्मट समाज सेविका होत्या समाजातील मागासवर्गाकरीता अतुलनिय कार्य केले.
मुलिंची पहीली शाळा १ जानेवारी १८४८ मध्ये सुरू करून महिलांच्या शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवली. अश्या थोर समाज सेविकेचा मृत्यू 10 मार्च 1897 मध्ये झाला. त्यांच्या कार्यास शतदा नमन…!
यावेळी शाळेतील विद्यार्थ्यांसह पालक व शाळेचे मुख्याध्यापक दिनेश देवाळकर, ग्रा.पं.सदस्य निकेश बोरकुटे, शिक्षिका सविता ढोडरे यांच्या उपस्थितीत सदर कार्यक्रम पार पडला.