स्त्री ही सर्व जगाची आधारशक्ती- शिल्पा कुळसंगे
जागतिक महिला दिनाचा कार्यक्रम आमडी येथे संपन्न
कोठारी:— राज जुनघरे
भरारी ग्रामसंघ आमडी च्या वतीने ग्रामपंचायत आमडीच्या प्रांगणात जागतिक महिला दिना निमित्त कार्यक्रम अतिशय उत्साहात साजरा करण्यात आला.
कार्यक्रमाचे उदघाटन शिक्षणाच्या आराध्य क्रांतिजोती सावित्रीमाई फुले यांच्या प्रतिमेस माल्यार्पण करून व दीप प्रज्वलनाने करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गावाच्या प्रथम नागरिक शिल्पा कुळसंगे, सरपंच, ग्रा.प. आमडी, उदघाटीका अर्चना वासाडे माजी सरपंच आमडी व प्रमुख पाहुणे म्हणून नत्थुजी पाटील वांढरे, धनराज चौथले (उपसरपंच) , सुरेश पाटील वासाडे, . प्रशांत भंडारे, अल्का मोरे (पो.पा.) अल्का वासाडे, पुष्पा चौधरी, शालिनी मोरे, संगीता काळे, कुसुम मोरे ,चांगुना मेश्राम, बिता बानकर, मधुकर बोन्डे, अनिल पाटील मोरे, दिवाकर बोंडे , बंडू गेडाम, प्रा. जयंत वासाडे हे होते.
‘स्त्री ही संपूर्ण जगाची आधार शक्ती आहे.’ असे मनोगत कार्यक्रमाच्या अध्यक्षा मान. शिल्पा कुळसंगे यांनी व्यक्त केले. कार्यक्रमासाठी उपस्थित असलेल्या सर्व मान्यवरांनी भरारी ग्रामसंघाचे कौतुक करीत महिला शक्ती एकजुटीने नवनवीन संकल्पना राबवून सकारात्मक मार्गाने गावाचा कसा कायापालट करू शकतात याबद्दल मार्गदर्शन केले.
विचारपीठावर उपस्थित सर्व महिलांनी दिलेली ओघवती व प्रभावी भाषणे ही ग्रामीण भागातील एक कौतुकास्पद बाब ठरली.
या कार्यक्रमानंतर लहान मुलामुलींचा कलाविष्कार म्हणून नृत्य कार्यक्रम झाला तदनंतर महिलांच्या विविध मनोरंजक खेळांच्या स्पर्धा आयोजण्यात आल्या.अश्याप्रकारे महिला दिनाचा कार्यक्रम आमडी येथे साजरा झाला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वनिता वासाडे यांनी केले तर आभार प्रदर्शन उज्ज्वला वासाडे यांनी केले.