कठीण परिस्थिती व जीद्दीच्या भरोशावर केंद्रीय पात्रता परीक्षा पास
कोरपना, प्रवीण मेश्राम
अनेक संकटांचा सामना करून किशोर कुमार वामन आत्राम या युवकाने नुकतीच केंद्रीय पात्रता परीक्षेत घवघवीत यश मिळवले. अपंगत्वावर मात देऊन त्यांनी हे यश मिळवले. काही वर्षापूर्वीच आईचे निधन व त्यातच त्याचा अभ्यासक्रम असे अनेक अनेक कठीण प्रसंग त्यांच्या जीवनात आले. अपंग कल्याण निधी अंतर्गत येणाऱ्या पैशातून त्यांनी पुस्तकं विकत घेऊन हा अभ्यास केला. काही मित्राच्या सहकार्यातून त्यांनी शरद पवार कॉलेज ग्रंथालयामध्ये अभ्यासक्रमाला सुरुवात केली. जेव्हा वेळ मिळेल तेव्हा, त्याला त्या अभ्यासक्रमात अभ्यास करून तो आपला गुजारा करत असे. आईचे निधन झाल्यामुळे त्याच्यावर घराचे कामकाज पडले. स्वयंपाक करून तो ग्रंथालयांमध्ये जाऊन अभ्यास करीत असे. वडिलांचे वय झाल्यामुळे त्यांचा पण सांभाळ याच्यावर होता. अशातच त्यांनी केंद्रीय पात्रता परीक्षा मध्ये भाग घेऊन यात घवघवीत यश संपादन केले. त्याच्या या यशाचे सर्वत्र कौतुक होत आहे. त्याने सिद्ध करून दाखवले की, जिद्द व चिकाटी असल्यास कोणतेही यश संपादन करता येते.