मॅजिक बस तर्फे जागतिक महिला दिन साजरा

0
654

मॅजिक बस तर्फे जागतिक महिला दिन साजरा

 

आज दिनांक 8 मार्च 2022 जागतिक महिला दिनाचे अवचीत्य साधून मॅजिक बस इंडिया फौंडेशन चंद्रपूर च्या वतीने जागीतक महिला दिन साजरा करण्यात आला यात चंद्रपूर तालुक्यातील शाळा व गावामध्ये महिला दिन साजरा करण्यात आला.

महिला दीना च्या निमित्ताने शाळेत, निबंध,भाषण, संगीत, स्पोर्टिंग गमे, रॅली अश्या विविध मुलींच्या स्पर्धा घेण्यात आल्या व बक्षीस वितरण करण्यात आले तर गावामध्ये विविध आरोग्य तपासणी ,रक्तदान शिबिर, असे अनेक उपक्रम राबविण्यात आले. व आजची महिला या धकाधकीच्या जीवनातंही स्वतः कशी समोर येईल व महिला सक्षमीकरण साधून महिलांचा सर्वांगीण विकास करता येईल अश्या विविध विषयावर मान्यवरांचे मार्गदर्शन या कार्यक्रमात लाभले.

या कार्यक्रमाचे आयोजक मा प्रशांत लोखंडे मॅजिक बस जिल्हा कार्यक्रम अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली , व निदर्शनात आयोजन करण्यात आले होते तर हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी सर्व शाळेतील मुख्याध्यापक व सर्व शिक्षकवृंद , शाळा व्य. समिती, शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी विशेष मोलाचे मार्गदर्शन व सहकार्य केले तर गावातील सरपंच, ग्रामपंचायत,युवक, युवती, व समस्थ ग्रामस्थांनी सहकार्य केले व हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी मॅजिक बस चे समुदाय समन्वयक व शाळा सहायाक अधिकारी संदेश चुनारकर, गणेश दुधबळे यांनी परिश्रम घेतले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here