अचूक मतदान निकाल…..!
संगमनेर, ०८ मार्च २०२२
पाच राज्यात निवडणुका पार पडल्या. पाच ही राज्यात गल्ली ते दिल्ली चे पत्रकार, राजकीय विश्लेषक फिरत होते. अनुमान काढत होते. कोणत्या मतदार यांना ते भेटतात व काय निकष लावतात याचा अभ्यास करणं हे सर्व सामान्य जनतेला माहिती असणं आवश्यक आहे. प्रत्येक टीव्ही चॅनल आपआपले वेगळे फंडे वापरतात. मुख्यतः यात त्या तालुक्यातील या मतदार संघातील सुमारे तीनशे ते चारशे लोकांच्या या मतदार यांच्या संपर्कात जातात. त्यांचा वयोगट केला जातो, सरकार कोणते चांगले, कोणते नको या बाबत ठराविक गटांना न विचारता, जातीय समीकरणे लक्षात घेऊन, तसेच धर्म आधारित communities समाज यांना ही विचारात घेऊन माहिती गोळा केली जाते. यावर आधारित अनुमान काढले जातात. काही राजकीय पक्ष हे अनुमान हायजॅक ही करतात. प. बंगाल मध्ये भाजपने काही करोडो रुपये खर्च करून अनेक गोदिया मीडिया पोर्टल ताब्यात घेतले होते. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या वेळी अशीच वस्तुस्थिती होती. हे अंध अंदाज फार काळ लपून राहत नाहीत. संगमनेर मध्ये बाळासाहेब थोरात मोठ्या मतांनी पराभूत होणार, अशी लोकमत १८ (पुढे लोक फेकमत म्हणायला लागले) ब्रेकिंग न्युज दाखवत होते. लोक हसत होते. या मधून असल्या चॅनल ची खात्री व विश्वास उडून जातो. अकोल्यात ही वैभव पिचड सत्तर हजार मतांनी विजयी होणार असे सर्व चॅनल अनुमान काढत होते, झाले उलटेच… अशी अनेक उदाहरणे आहेत. या वर विश्वास किती ठेवायचा हे अंजना कश्यप व अन्य मीडिया सांगेल…
थोडक्यात ही एक करमणूक आहे. मी केंद्रीय सरकारी अधिकारी होत. माझे भारत भर मित्र आहेत. महाराष्ट्र राज्याचा मी सेवानिवृत्त अधिकारी व कर्मचारी यांच्या सेवानिवृत्त संघटनेचा प्रमुख आहे. अनेक राज्यात माझे मित्र आहेत. प. बंगाल निवडणुकीत मी माझ्या विविध भागातील प. बंगालच्या मित्रांकडून ग्राउंड रिपोर्ट घेत होतो. तुमचे घर, मित्र, शेजारी, गल्ली, नातेवाईक कुणाला मतदान करणार याचे विश्लेषण मुद्दामहून घेत होतो. अनेक मित्र मला वास्तवता सांगत होते. त्या आधारावर मी ठामपणे दीदी येणारच, हे निक्षून सांगत होतो. भाजप नेते यांना ही सांगत होतो पण ते अंध झाले होते. भाजप ने दीदी ला हटवण्या करिता काय नाही केलं हे संपुर्ण देश जाणतो. सर्वच वाहिन्यांचे अंदाज तिथं फोल ठरला होता.
उत्तर प्रदेश मध्ये माझ्या ओळखीचे तीन जण निवडणूक लढवत आहेत. त्यात काँग्रेस कडून एक महिला आहे. ऐन प्रचारात मी त्यांना फोन करत असे, ते मला प्रत्यक्ष व्हिडिओ टाकत असत. नोएडा, फिरोदाबाद भागात माझे दलीत समाजातील काही मित्र आहेत. गोरखपूर मधील शुक्ला माझे मित्र आहेत. विजय बहादुर हे वाराणशी भागातील मित्र आहेत. अर्पणा मॅडम अयोध्या मधून आहेत. कमलेश हा आदिवासी समाजातील जौनपुर येथील मित्र आहे. यांच्या कडून व विशेषतः आरएसएस मध्ये काम करणारे चेतन दुबे, नारायण कुमार मिश्रा हे खास मित्र आहेत. त्यांचे सर्वांचे म्हणने होते. “बाबा तो जायेगा” तो भी काटे की टक्कर है, बोल नहीं सकते कौन जितेगा. अनुमान है की मायावती को सत्ता मे लेके बाबा वापस मुख्यमंत्री हो सकते हैं.
उत्तराखंड मध्ये माझ्या सर्वच मित्रांनी काँग्रेस वर शिक्का मोर्तब केले आहे. मणिपूर ची चावी नागा पीपल्स पार्टी च्या हातात आहे. गोवा तर कुणालाच बहुमत मिळणार नाही, पण काँग्रेस, त्रूनुमल काँग्रेस, शिवसेना एक, राष्ट्रवादी एक असे मिळून सरकार स्थापन करतील. गोव्यात भाजपचा मागच्या दाराचा खेळ या वेळी चालणार नाही इतकं नक्की.
थोडक्यात दहा मार्च परवा आहे. यातून लपून काही राहणार नाही. जे चित्र दिसतंय ते मांडले आहे. टीव्ही चॅनल धंदा म्हणून या बाबी कडे पाहतात. आपण अभ्यास म्हणून पाहिले पाहिजे. भाजप तीन राज्यातून जाणार हे नक्की…, आप बाबत पंजाब चे सर्व अंदाज सर्व टीव्ही चे चुकणार हे मी छातीठोक पने सांगतो. भाजप यूपी मध्ये कुबड्या घेऊन सरकार बनवू शकते. पुढे लोकसभा निवडणुका आहेत. मोदींना प्रतेक राज्यात लोक रस्त्यावर येऊन विरोध करायला लागले आहेत. लोकसभेत भाजपचा रस्ता युपी मधून जायचा, तो आता अवघड घाट झाला आहे. हा घाट पार करताना नक्कीच त्यांची दमझाक होईल… २०२४ विरोधकांना सुकर असेल…
— ज्ञानेश्वर गायकर पाटील