आप ने लावलेले राजीनाम्याचे बॅनर पालिकेने तासाभरातच काढले
भ्रष्ट राजकारण्यांचा अतिक्रमण विभागाच्या अधिकाऱ्यांवर दबाव
आम आदमी पार्टी चंद्रपुर च्या वतीने महापौर सौ .राखीताई कंचर्लवार तसेच श्री देवानंद वाढई सभागृह नेते तथा नगरसेवक यांनी राजीनामा द्या, अशा मागणीचे फलक लावण्यात आले होते. पण महापौर यांच्या सांगण्यावरुण अवघ्या काही तासातच अतिक्रमण विभागाने ते बॅनर काढले.
वडगाव प्रभागातील महापौर निधितिल एक कोटिच्या घोटाळ्या प्रकरणी चौकशी सुरु असून, नैतिक जवाबदारी म्हणून त्यानी राजीनामा द्यावा, अशी मागणी आम आदमी पार्टी ने केली आणि राजीनाम्या ची मागणी करणे हा आमचा संवैधानिक अधिकार आहे.
विशेष म्हणजे बैनर काढून स्वता महापौर सौ.राखीताई कंचर्लवार व सभागृह नेते देवानंद वाढई यानी या निधीतून एक कोटिच्या घोटाळ्याचे प्रकरण जनते समोर येऊ नये, या करीता विशेष लक्ष ठेवले आहे .
जनतेची दिशाभूल करीत आम्ही प्रभगातील विकास करीत आहोत. पण विरोधी आम्हाला विकास करू देत नाही, असा कांगावा करून भ्रष्टाचार केला जात आहे, अशी टीका
युवा जिल्हाध्यक्ष मयुर राईकवार यांनी केली आहे.
अतिक्रमण अधिकारी यांची भेट घेताना सुनील देवराव मुसळे जिल्हाध्यक्ष, भिवराज सोनी जिल्हा कोषाध्यक्ष ,मयूर राईकवार युवा जिल्हाध्यक्ष, राजू कुळे शहर सचिव, सिकंदर सागोरे शहर उपाध्यक्ष ,संतोष बोपचे ,सुनील सिदभैय्या तसेच अनेक पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.