कांग्रेसी विळख्यात मुजरा करणा-या राऊतांना आत्मचिंतनाची गरज : अरविंद सांदेकर
पुर्व विदर्भ समन्वयक, वंचित बहुजन आघाड़ी
बाळासाहेब आंबेडकर कधी सत्तेसाठी कुणासामोर झुकले नाही. सदैव वंचित घटकाला न्याय मिळवुन देण्यासाठी झटत आहेत. म्हणुन बहुजन समाज त्यांच्या पाठीशी पुर्ण ताकदीने उभा राहु पाहत आहे. ज्यामुळे कांग्रेसच्या पोटात गोळा तयार होत आहे. त्यामुळे बाप विसरणारी, स्वता: कांग्रेसी घराण्याशाहीच्या विळख्यात मुजरा करणा-या नितीन राऊतांना आत्मचिंतन करण्याची गरज आहे. अशी सटीक टिका वंचित बहुजन आघाडीचे पूर्व विदर्भ समन्वयक अरविंद सांदेकर यांनी केली.
नितिन राऊतांच्या प्रत्येक थेंबात जयभिम आहे तर कांग्रेस जळत घर आहे. कांग्रेस बिजपी ची माता आहे. या डाँ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या वक्तव्याचा विसर कसा पडतोय. सोनिया गांधी, राहुल गांधी, कांग्रेस तर मेनका गांधी, बिजेपी यावर आधी विचार करावा.
कांग्रेसी रक्त नसुन स्वतःच्या राजकीय सत्तेच्या हव्यासापोटी लोकांची दिशाभुल करीत स्वतःचा स्वार्थ साधण्यासाठी आयुष्यभर एका ओळीत कांग्रेसच्या पाया पडण्याच काम राऊतांनी केले आहे. आधी स्वताचा विचार करावा. ऊर्जा मंत्री असुन सुध्दा कोरोना काळातील सर्वसामान्याचे लाईट बिल माफ करु शकले नाही. तर जनतेकडुन जबरदस्तीने लाईट बिल वसुल केले.
संविधानिक एससी, एसटी चे पदोन्नती आरक्षण महाराष्ट्र मंत्री मंडळाने रद्द केले त्यावेळी मुंग गिळुन गप्प का राहले…? मा. बाळासाहेब आंबेडकरांनी स्वतःचाच विचार केला असता तर झोपेतही ऐच्छीक केंद्रीय मंत्रीपद मिळाले असते. पंरतु बाळासाहेबांनी शोषीत पीड़ित वंचित घटकांना न्याय मिळवुन देण्यासाठी सदैव तत्पर राहत युथ लिडरशिप तयार करण्याचे काम करीत आहेत. बहुजन समाज श्रद्येय बाळासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वार विश्वास ठेवुन त्यांच्या पाठीशी खंबिरपणे उभा आहे.