नांदा येथील रास्तभाव दुकानदाराकडून रेशनकार्ड धारकांची लुट
मोफतच्या धान्याचा काळाबाजार
कोरपणा प्रतिनिधी: कोरपना तालुक्यातील नांदा येथील रास्तभाव दुकान रद्द करण्यात आले असल्याने वर्षभरापूर्वी आदर्श महिला परिवार बचत संघ , पिपर्डा यांना नांदा येथील रास्तभाव दुकान जोडले होते बचत गटाकडून चालविण्यात येत असलेल्या दुकानामध्ये अनेक अनियमितता व काळाबाजारी होत असल्याने शिधापत्रिका धारकांनी तहसीलदार कोरपना यांच्याकडे तक्रार करून दुकान बदलविण्याची मागणी केली होती. त्या अनुषंगाने चौकशी करून तहसीलदार कोरपना यांनी आदर्श महिला परिवार बचत संघ पिपर्डा ( कुकुडबोडी ) यांच्याकडून नांदा येथील रास्तभाव दुकान काढून घेतले असून अनियमितता आढळल्याने कारवाईकरिता चौकशी अहवाल जिल्हा पुरवठा अधिकारी यांच्याकडे पाठविला आहे. प्रधानमंत्री मोफत योजनेचे माहे जानेवारीचे धान्य फेब्रुवारी महिन्याच्या शेवटच्या हप्त्यांत दुकानदाराला प्राप्त झाले. २८ फेब्रुवारी व १ मार्च रोजी शिधापत्रिकाधारकांना मोफतच्या धान्याचा वाटप करण्यात आला. अनेक शिधापत्रिकाधारक माहे जानेवारीचे मोफतचे धान्य उचल करण्याकरिता नांदा येथील रास्तभाव दुकानात गेले असता अनेक शिधापत्रिकाधारकांचे धान्याचे बिल १४ , १५ व १६ जानेवारीला यापूर्वीचे दुकानदार आदर्श महिला परिवार बचत संघ , पिपर्डा ( कुकुडबोडी ) यांनी काढले. मात्र शिधापत्रिका धारकांना मोफतचे धान्य दिले नसल्याची शिधापत्रिका धारकांनी माहिती दिली शिधापत्रिकाधारकांचे फिंगर घेऊन त्यांचे बिल काढून त्यांना मोफत धान्य दिले नसल्याने शिधापत्रिकाधारकांची लूट केली आहे. येथील शिधापत्रिकाधारकांनी आदर्श महिला परिवार बचत संघ पिपर्डा (कुकडबोडी) या रास्तभाव दुकानदारावर कारवाईची मागणी तहसीलदार कोरपना यांच्याकडे केली आहे.
मोफतच्या धान्यापासून वंचित दिनांक १ मार्च २०२२ रोजी मी जानेवारी महिन्याचे मोफत धान्य उचल करण्याकरिता नांदा येथील रास्तभाव दुकानात गेले असता माझे नावाचे बिल १६ जानेवारी रोजीच काढले. असल्याची मला माहिती मिळाली परंतु यापूर्वीच्या दुकानदाराने मला जानेवारी महिन्याचे मोफतचे धान्य दिले नाही. चौकशी करून कारवाई करावी. – सुरेखा मनोहर इंगोले शिधापत्रिकाधारक, नांदा
मोफतच्या धान्याचा काळाबाजार २८ फेब्रुवारीला जानेवारी महिन्याचे मोफतचे धान्य उचल करण्याकरिता रास्तभाव दुकानात गेले होते. माझे नावाचे धान्य यापूर्वीच उचल केली असल्याने मला धान्य मिळाले नाही याबाबत माहिती घेतली असता १६ जानेवारी राेजी माझे नावाचे बिल काढले गेले. परंतु ३५ किलो धान्य आम्हाला मिळालेच नाही. आमचे नावाचे मोफतच्या धान्याचा काळाबाजार येथील दुकानदाराने केला आहे चौकशी करून कारवाई करावी. – ज्योती रमेश चौधरी शिधापत्रिकाधारक, नांदा