धाबा, हिवरा व पोडसा या राज्य मार्गात जमिनी गेलेल्या शेतकऱ्यांना तातडीने मोबदला द्या…!
अन्यथा वंचित बहुजन आघाडी तर्फे रस्त्यावर उतरून तीव्र काम बंद आंदोलन करण्याचा इशारा
गोंडपिपरी, 28 फेब्रु. : आज वंचित बहुजन आघाडी गोंडपिपरी तालुका शाखा द्वारा तहसीलदार गोंडपिपरी मार्फत जिल्हाधिकारी चंद्रपूर व उपविभागीय अधिकारी गोंडपिपरी यांना निवेदन देऊन धाबा, हिवरा व पोडसा हा राज्य मार्ग सन 1971 पासून सुरु झालेला होता. आज 50 वर्ष झालेले आहेत. परंतु या मार्गात शेतकऱ्याच्या जमिनी गेलेल्या होत्या. त्या शेतकऱ्यांना आज पर्यंत आंदोलन करून सुद्धा कोणत्याही प्रकारचा मोबदला मिळालेला नाही. परत त्याच मार्गाचे रुंदीकरण चालू केलेले आहे. त्यामुळे पुन्हा शेतकऱ्याचा अधिकच्या जमिनी जात असल्याने परत तीच परिस्थिती निर्माण झालेली आहे.
तरी या मार्गामध्ये गेलेल्या शेतकऱ्याच्या जमिनीचा सर्वे करून त्यांना त्वरित 10 दिवसात मोबदला देण्यात यावा. अन्यथा वंचित बहुजन आघाडी रस्त्यावर उतरून तीव्र काम बंद आंदोलन करण्यात येईल. या शेतकरी आंदोलनाच्या पाठीमागे खंबीरपणे उभे राहू व होणाऱ्या परिणामास शासन जबाबदार राहील अशाप्रकारे निवेदन देण्यात आले.
निवेदन देताना वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा महासचिव धीरज बांबोडे, जिल्हा उपाध्यक्ष सुरेश दुर्गे, गोंडपिपरी तालुका अध्यक्ष प्रकाश तोहोगावकर, तालुका महासचिव संदेश निमगडे, तालुका महासचिव सुरेंद्र रायपुरे, तालुका उपाध्यक्ष भारत चंद्रागडे, गोंडपिपरी तालुका महिला आघाडी महासचिव विजया दुर्योधन, प्रसंजित डोंगरे, दुर्गे खराळपेठ, शैलेश दुर्योधन इत्यादी कार्यकर्ते उपस्थित होते.