वैशाली बुध्द विहारातील अभ्यासीकेला पुस्तक व संगणक खरेदीसाठी ११ लक्ष रुपयांचा निधी देणार – आ. किशोर जोरगेवार
बुध्द विहार व अभ्यासीका भुमिपूजन समारंभ
लोकसहभागातून साकार होत असलेल्या या बुध्द विहारातून भविष्यात भगवान गौतम बुध्दांच्या विचारांचा प्रसार – प्रचार होणार आहे. त्यानी समाजाला दिलेला प्रज्ञा, शील, करुणा हा संदेश या बुध्दविहरातून घराघरात पोहचावा अशी अपेक्षा व्यक्त करत तयार होत असलेल्या वैशाली बुध्द विहाराच्या अभ्यासीकेला पुस्तक व संगणक खरेदीसाठी ११ लक्ष रुपये देण्याची घोषणा आमदार किशोर जोरगेवार यांनी केली.
लोकसहभागातून भिवापूर वार्डात तयार होत असलेल्या वैशाली बौध्दविहार आणि अभ्यासीकेच्या कामाचे आज आमदार किशोर जोरगेवार यांच्या हस्ते भुमिपूजन करण्यात आले. या भुमिपूजन सोहळ्यात ते बोलत होते. यावेळी नगर सेवक नंदू नागरकर, नगर सेवक स्नेहल रामटेके, नगर सेविका मंगला आखरे, नगर सेविका सुनिता लोढीया, गौरिशंकर टिपले, शालीनी भगत, सुभाष गौर, दिलीप वावरे, विजय निरंजने, दौलत चालखूरे, दामोदर कुमरे, धांडे, ताकसांडे, सोनटक्के, नगराळे आदि मान्यवरांची उपस्थिती होती.
यावेळी पूढे बोलतांना आमदार किशोर जोरगेवार म्हणाले कि, महामानव डॉ. बाबासाहेब आंबडेकर यांनी जगात नागपूर आणि चंद्रपूर अशा दोनच ठिकाणी बौध्द धम्माची दिक्षा दिली. नागपूर येथील दीक्षाभूमीचा विकास झालेला आहे. मात्र चंद्रपूर येथील दीक्षाभूमी अविकसित राहिली आहे. येथे देशभरातुन येणाऱ्या अनुयायांसाठी कसल्याही सोयीसुविधा उपलब्ध नाही. त्या अनुषंगाने दीक्षाभूमीचा सर्व समावेशक विकास व्हावा या करिता माझे प्रयत्न सुरु आहे. निवडून आल्या नंतर पहिल्यास हिवाळी अधिवेशनात आपण दिक्षाभूमीच्या विकासासाठी एकत्रीत १०० कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करुन देण्यात यावा अशी मागणी केली होती. तर येथील संविधान भवणासाठी आपण ५० कोटी रुपयांचा प्रस्ताव समाज कल्याण विभागातर्फे पाठविला असल्याचे ते यावेळी म्हणाले,
भगवान गौतम बुध्द यांना शांती व अहिंसेचे दैवत मानले जाते. ज्या काळात संपूर्ण भारतात हिंसा, अशांती, अंधविश्वास आणि अधर्म वाढला होता तेव्हा भगवान बुद्धांनी अवतरीत होऊन सर्व लोकांना या बंधनातून मुक्त केले. महात्मा बुध्द एक युग प्रवर्तक होते. त्यांनी केवळ भारतातच नव्हे तर संपूर्ण विश्वात आपल्या ज्ञानाने ज्योत पेटवली. जगातील महान धार्मिक गुरूंपैकी ते एक होते. त्यांनी सत्य, अहिंसा, शांती, मानवता आणि समानतेचा संदेश जगाला दिला. त्यांची शिकवण आणि गोष्टी बुध्द धर्माचा आधार आहेत. त्यांच्या या शिकवणीची आजही समजाला गरज असल्याचे ते यावेळी म्हणाले. त्यामूळे त्यांचे जिनवचारित्र्य दर्शविणारे पुस्तके या अभ्यासिकेत उपलब्ध झाली पाहिजे. त्यांचा इतिहास येण्या-या अनेक पिढ्यांना मुख्यपाठ असला पाहिजे असेही ते यावेळी म्हणाले. या कार्यक्रमाला स्थानिक नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.