चनाखा येथे वंचित बहुजन आघाडी ची ग्राम शाखा गठित
राजुरा, २१ फेब्रु. : जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुका लक्षात घेता वंचित बहुजन आघाडी जोमाने कार्याला लागली आहे. श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर यांच्या आदेशानुसार जिल्हाध्यक्ष भूषण फुसे यांनी ‘गाव तेथे शाखा’ ‘शाखा तेथे फलक’ या अभियानाला सुरवात केली असून वंचित बहुजन आघाडीचे पदाधिकारी व कार्यकर्ते सक्रियतेने सहभाग घेताना दिसून येत आहे.
याच अभियानांतर्गत काल चनाखा येथे वंचित बहुजन आघाडी ची ग्राम शाखा गठित करण्यात आली. यावेळी ग्राम शाखेच्या फलकाचे अनावरण व उद्घाटन जिल्हाध्यक्ष भूषण फुसे यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाचे अध्यक्ष सुशिल मडावी तालुका अध्यक्ष राजुरा हे होते. जिल्हा उपाध्यक्ष आनंदराव अंगलवार,जिल्हा सचिव रमेश लिंगमपल्लीवार, प्रसिद्धी प्रमुख अमोल राऊत, जिल्हा सदस्य भागिरथ वाकडे आदी उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीराम मडावी यांनी केले. तालुका उपाध्यक्ष धनंजय बोर्डे तसेच तालुका महासचिव सदानंद मडावी यांनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतले.यावेळी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी ग्राम शाखा अध्यक्ष म्हणून रामराव वडस्कर, उपाध्यक्ष विशाल रामटेके, उपाध्यक्ष मदन टेकाम, महासचिव राजकुमार रामटेके, प्रकाश दुर्योधन ग्राम पंचायत सदस्य यांची निवड करण्यात आली. सर्व नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचे उपस्थितांकडून अभिनंदन करण्यात आले. पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या.
भुषण फुसे यांनी आपल्या भाषणात ओबीसी समाजाच्या विविध प्रश्नांवर तसेच ओ बी सी समाजावर होणाऱ्या अन्यायास काँग्रेस व भाजप जबाबदार आहे. प्रस्थापित पक्षातील कोणत्याही ओबीसी समाजाचा आमदार किंवा खासदार गंभिर नाही.आज ओबीसी समाजाच्या राजकीय आरक्षणावर गदा आली आहे. भविष्यात शैक्षणिक व नौकरीतील आरक्षण सुद्धा नाहीसे होईल असा इशारा जिल्हा अध्यक्ष भुषण फुसे यांनी दिला.
यावेळी आपल्या अध्यक्षीय भाषणात सुशिल मडावी यांनी भाजप सरकार वर कडाडून टीका केली. केंद्र सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे देशाचे खूप मोठे नुकसान होत आहे. नोट बंदी, चुकीच्या पद्धतीने जीएसटी, कोरोना संक्रमण यासाठी केंद्र सरकार जबाबदार आहे. वंचित बहुजन आघाडीच्या गाव तेथे शाखा उपक्रमाला चांगला प्रतिसाद मिळत आहे.