सावकारी च्या नावाखाली गोरगरिबांच्या जमिनी बळकावनाऱ्यांवर कार्यवाही करा – सुरज ठाकरे
चंद्रपुर शहरातील सरकार नगर येथील रहिवासी श्री. ऋषीराज राधेश्याम सोमानी व यांची आई यांच्याकडे सावकारीचा कुठलाही प्रकारचा परवाना नसताना देखील गेल्या अनेक वर्षापासून सावकारीच्या नावाखाली गोरगरीब लोकांच्या जमिनी गिरवी ठेवून व्याजाने पैसे द्यायचे काम करीत आहे. सदर व्यक्ती कुणाला ८० हजार ,कुणाला एक लाख रुपये, अशी रक्कम देऊन त्यांची लाखो रुपयांची शेती स्वतःच्या नावे करून घेतो तथा मोठ्या शिताफीने गरजू लोकांच्या मजबुरीचा फायदा घेत वर्षानुवर्षे त्यांच्यापासून शेकडा दहा ते वीस टक्के प्रमाणे व्याज घेतो व ज्यावेळी पीडित व्यक्ती संपूर्ण पैशांची जुळवाजुळव करून त्याला पैसे वापस घेवून जमीन परत द्या अशी मागणी करतो त्यावेळी हा सावकार त्यांना अव्वाच्या सव्वा व्याज लावून लोकांच्या जमिनी पचवितो, आधीच त्याने जमिनीचे विक्रीपत्र करून ठेवले असल्याने कालांतराने जमीन आपल्या नावे करून घेण्यासाठी फेरफार करिता महसूल विभागाला अर्ज करतो व महसूल विभागातील काही अधिकाऱ्यांची आर्थिक साटेलोटे करून कास्तकार हरकत असताना देखील त्यांच्या हरकती ला बगल देत महसूल विभागातील अधिकारी या सावकारांच्या नावे सदर जमीन करून देतात. अशा प्रकारचे काम सदर व्यक्ती गेल्या अनेक वर्षांपासून करीत आहेत. पिडीत कास्तकारांनी या आधी देखील या संदर्भात पोलिस स्टेशन राजुरा येथे तक्रार केली. परंतु पोलीस विभागाने गैर अर्जदाराची पार्श्वभूमी न समजून घेता सदर प्रकरण दिवाणी स्वरूपाचे आहे. असे सांगून सदर प्रकरणाकडे दुर्लक्ष केल्याने पीडितांनी अखेर युवा स्वाभिमान पक्षाचे जिल्हाध्यक्ष श्री. सुरज ठाकरे यांच्याकडे धाव घेत त्यांना समस्या सांगताच श्री. सुरज ठाकरे यांनी दिनांक:- २१/०२/२०२२ रोजी पोलीस अधीक्षक चंद्रपूर यांना सदर प्रकरणा संदर्भात परत फेर विचार करण्याकरिता निवेदन देऊन तात्काळ सराईत भूमाफिया विरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी केली.
व पीडितांना न्याय न मिळाल्यास पीडितांनी उपोषणाची व वेळप्रसंगी आत्महत्या करण्याची देखील तयारी दर्शविली आहे.