शेतकरी कर्जमाफी करीता शेतकरी बांधवांनो एकत्र या – योगेश खामनकर
कोठारी, राज जुनघरे
शेतकरी कर्जमाफी चा विषय हा शासनाच्या उदासीनते मूडे अडून आहे. छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना असो वा महात्मा ज्योतिबा फुले शेतकरी कर्जमाफी योजना असो…! या दोन्ही योजना मधील पात्र 36000 शेतकरी आहेत. दोन्ही योजनांचा आढावा आमदार सूधीर मुनगंटीवार यांनी विधानभवन येथे घेतला होता. तेव्हा वित्त विभागाचे प्रधान सचिव अनूप कुमार यांनी दिवाळीच्या आधी महात्मा ज्योतिबा फुले योजनेतील शेतकऱ्यांना लाभ देण्याचे मान्य केले होते.
छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेतील शेतकऱ्यांना मार्च पर्यंत लाभ देण्याचे मान्य केले. पण प्रत्यक्षात मात्र शेतकऱ्यांना आज पर्यंत कूठला हि लाभ मिळू शकला नाही. म्हणून तोहोगाव येतील शेतकरी बांधवानी मा. अजीत पवार यांना अर्थसंकल्पीय अधीवेशनात कर्जमाफी करीता निधी उपलब्ध करून देण्यात यावी. या करीता पत्र पाठवले व मागणी केली. तेव्हा प्रामुख्याने बंडू गौरकार किशोर कासनगोट्टूवार, बंडू धोटे, रमेश राऊत, संदीप बुक्कावार, गंगाधर वाघाडे, योगेश खामनकर, प्रदिप निवलकर, गूलाब रागीट, इतर महिला व पूरूष शेतकरी हजर होते.