‘अजब कारभार’ प्रॉपर्टी नसलेल्या व्यक्तिला बजावली मनपाने नोटीस

0
725

‘अजब कारभार’ प्रॉपर्टी नसलेल्या व्यक्तिला बजावली मनपाने नोटीस

एक कोटि चा भ्रष्टाचार उघडकीस आणणाऱ्या मयुर राईकवार यांना भ्रष्ट सैरभैर झालेल्या सत्ताधार्‍यांनी अधिकाऱ्यांना हाताशी धरून पाठविले नोटिस

नोटीसमध्ये आवक जावक १३३६ क्रमांक २२ तारखेचे पत्र मिळाले ऐक दिवस अगोदर २१ तारखेला

चंद्रपूर शहर महानगरपालिकेच्या हद्दीत कुठेही नावाने स्थावर मालमत्ता नसतानाही महानगरपालिकेच्या सहायक आयुक्तांनी नोटीस बजावून चंद्रपूरच्या इतिहासात नवीनच विक्रम नोंदविला आहे. इतकेच नव्हे तर नोटीसचे आवक जावक क्रमांक 1336 तारीख 22 फेब्रुवारी असतानाही ही नोटीस ऐक दिवस अगोदर 21 तारखेला पाठवून कार्यतत्परता दाखवली आहे. यातून आवक जावकची नोंद आजच्या तारखेत करण्याऐवजी पुढील तारखेत होत असल्याचेही यातून स्पष्ट होते, चुकीचे आवक जावक क्रमांक नोंद करण्यामागे सत्ताधाऱ्यांचे मोठे राजकारण दडले आहे.

वडगाव प्रभागातील कोट्यावधींचा घोटाळा गैरप्रकार लपविण्यासाठी काय करू आणि काय नाही करू, असा प्रकार झाल्यानंतर मनपातील सत्ताधारी अधिकाऱ्यांना हाताशी घेऊन आप चे युवा अध्यक्ष मयुर राईकवार यांना विनाकारण त्रास देण्याचा प्रयत्न करीत आहेत.

मनपाच्या झोन क्रमांक एक ने बजावलेली नोटीस ही मयुर राईकवार यांच्या नावे असून, त्यांची कुठेही वादग्रस्त मालमत्ता नाही. नोटीस मध्ये ज्या मालमत्तेचा उल्लेख करण्यात आलेला आहे, ती मालमत्ता देखील मयूर राईकवार यांच्या मालकीची नाही किंवा ती त्यांच्या नावावर देखील नाही. मात्र महानगरपालिकेच्या झोन कार्यालयाने केवळ सुड बुद्धीतून मयूर राईकवार यांच्या नावे नोटीस बजावून स्वतःचेच हसे करून घेतले आहे.

मयूर राईकवार हे आम आदमी पार्टीचे युवा जिल्हाध्यक्ष आहेत. त्यांनी मागील काळामध्ये आणि आताही महानगरपालिकेच्या सत्ताधाऱ्यांनी केलेले अनेक गैरव्यवहार उघडकीस आणले. इतकेच नव्हे तर महापौर राखी कंचर्लावार यांच्या प्रभागातील वडगाव येथे पूर्वीच झालेल्या कामाची नवी निविदा काढण्यात आल्याचा प्रकार देखील उघडकीस आणून एक कोटि दाबन्याचा कट उधळून लावला . त्याला आम आदमी पार्टीचे जिल्हाध्यक्ष सुनील मुसळे यांनी उचलून धरत चौकशीची मागणी केली. विभागीय आयुक्तांनी दिलेल्या आदेशावरून जिल्हाधिकार्‍यांनी चौकशी समिती गठित केली. आता ही चौकशी समिती पाच दिवसांमध्ये आपला अहवाल सादर करणार आहे. वडगाव येथील झालेल्या कामात गैरप्रकार झाल्याचे हे स्पष्ट शंभर टक्के शुद्ध व खरे असल्याने महापौरांनी पांघरलेला पारदर्शकतेचा बुरखा आता उघडा पडणार आहे. त्यामुळे महापौरांच्या सांगण्यावरून झोन 1 सहाय्यक आयुक्तांनी मयुर राईकवार यांच्या नावे नोटीस काढून दबाव टाकन्याचा प्रकार सुरू केला आहे. मुळातच मयूर यांच्या नावे ही मालमत्ता नाही. नोटीस मध्ये ज्या जागेबाबत उल्लेख करण्यात आलेला आहे ती करोडोची जागा महापौर राखी कंचर्लावार यांच्या व कौटुंबिक सदस्य माधुरी राजेंद्र कंचर्लावार यांची नावाने आहे. यावरून हे आता स्पष्ट होते की, महापौरांनीच आपले करोडोंचा भ्रष्टाचार लपवण्यासाठी हा नवा डाव रचला आहे. मात्र मुळात अधिकाऱ्यांनी सत्ताधाऱ्यांच्या अशा दबावाला बळी न पडता आपले काम योग्य व निष्पक्ष पद्धतीने करावे, अन्यथा आम आदमी पार्टी भ्रष्टाचाराचा हा चेहरा उघड केल्याशिवाय राहणार नाही, याची नोंद घ्यावी.

या पत्रकार परिषद मध्ये जिल्हाध्यक्ष सुनिल मुसळे, युवा जिल्हाध्यक्ष मयुर राईकवार, जिल्हा कोषाध्यक्ष भिवराज सोनी, महानगर महिला अध्यक्ष एड सुनिता पाटिल, शहर सचिव राजू कूड़े, महानगर उपाध्यक्ष सिकंदर सगोरे, सोशलमीडिया हेड राजेश चेटगुलवार,अशरफ सैयद,एड राजेश विराणी, चंदू माडुरवार इत्यादि उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here