पाणीपुरवठा योजनेवर अखेर फोडली महीलांनी घागर

0
907

पाणीपुरवठा योजनेवर अखेर फोडली महीलांनी घागर

चार वर्षांपासून रखडलेली योजना 
साडेतीन कोटीची योजना निष्क्रिय 

कोठारी / राज जुनघरे
खनिज विकास निधी अंतर्गत साडेतीन कोटी रुपये खर्च करून कोठारीत नळयोजना अस्तित्वात आनण्यात आली. मात्र लोकप्रतिनिधींची अनास्था आणि महाराष्ट्र जीवन प्राधिकरण यांच्या ढिसाळ कारभारामुळे नळ योजनेचे पाणी गावकऱ्यांच्या घरा पर्यंत पोहचू शकले नाही. सदर पाणीपुरवठा योजनेची इमारत शोभेची वस्तू ठरली असून ग्रामस्थांच्या मानगुटीवर बसलेल्या योजनेच्या व स्थानिक स्वराज्य संस्थेच्या विरोधात महीला आक्रमक होऊन ग्रामपंचायतीच्या दारावर रिकाम्या घागरी फोळत निषेध नोंदविला.

मागील पंधरा वर्षांपासून कोठारीत अस्तित्वात असलेली जुनी पाणीपुरवठा योजना शुल्लक कारणावरून व ग्रामपंचायतीच्या नाकर्तेपणामुळे बंद पडलेली होती. गावात पाण्याची तीव्र टंचाई निर्माण झाली आणि आजही आहे. ग्रामस्थांना हातपंपाच्या दूषित पाण्यावरच विसंबून रहावे लागत असल्यामुळे शारीरिक व्याधी व रोगाचा सामना करावा लागतो आहे. त्यातच स्थानिक नागरिक हे शेतीव्यवसायाशी निगडित असुन मजूरांची संख्या मोठ्या प्रमाणावर आहे. अनेक वर्षांपासून सार्वजनिक हातपंप अस्तित्वात असले तरी गंज खालेले व गढूळ पाणी गावकऱ्यांच्या नशीबी आल्याने अनेक वर्षांपासूनची पाणी समस्या उग्र रूप धारण करू लागली आहे. बल्लारपूर विधानसभेचे आमदार व माजी राज्याचे अर्थ तथा नियोजन मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी ही योजना कोठारीकरांसाठी बहाल केली. वर्धा नदीचे पाणी जलशुद्धीकरणाद्धारे शुद्ध करून नळाद्वारे गावकऱ्यांना पुरवठा करण्यात येणार असल्याची अमृतूल्य योजना होती. मात्र महाराष्ट्र जीवन प्राधिकरण या विभागाच्या अधिकाऱ्यांनी व कंत्राटदारानी योजनेचे बांधकाम करित असता आणि गावात पाइपलाइन चे काम करतांना दुर्लक्ष केले. तसेच एकाच चाचणी परिक्षणात ग्रामपंचायत पुढाऱ्यांनी हस्तांतरण करून स्थानिक प्रशासन व गावकऱ्यांच्या मानगुटीवर कुचकामी दगड लादुन घेण्यात आला. चार वर्षांपासून रखडलेली योजना आणि उफाडलेला जनाक्रोश, विद्यमान सरपंच्याकडून होत असलेली गावकऱ्यांची बोळवण पाहता महीला व वंचित बहुजन आघाडी च्या वतीने मळकी फोडून प्रशासनाचा व लोकप्रतिनिधींचा निषेध नोदवित आंदोलन करण्यात आले. बल्लारपूर चे नायब तहसीलदार साळवे व कोठारी पोलिस निरीक्षक तुषार चव्हाण यांना निवेदन देवून पाणीपुरवठा योजना तात्काळ सुरू करण्याचा आग्रह धरला.

“शासन, प्रशासन ,व लोकप्रतिनिधी यांच्या अनास्थेमुळे गावकरी शुद्ध पिण्याच्या पाण्यापासून वंचित आहेत. साडेतीन कोटीची योजना ही शोभेची वास्तू ठरली आहे. याकडे ग्रामपंचायत पदाधिकारी कानाडोळा करीत असून मागील चार वर्षापासून ठोस भुमीका स्थानिक प्रशासनाने घेतलेली नाही. जलसंटाचा सामणा करणाऱ्या गावकऱ्यांना तात्काळ पाणी पुरवठा सुरू करावा अन्यथा येत्या दहा दिवसात आमरण उपोषणाला बसणार.”
धिरज बांबोळे
वंचित बहुजन आघाडी

“सन २०१३/१४ मध्ये पाणीपुरवठा योजना मंजूर करण्यात आली. जलशुद्धीकरणाचे काम सन २०१६/१७ मध्ये पुर्णत्वास आले. परंतु संबंधित विभागाशी संलग्नित अधिकारी व स्थानिक ग्रामपंचायत पदाधिकारी यांनी परस्पर दुर्लक्ष केल्यामुळे गावातील पाइपलाइन चे काम पुर्णपणे चुकीचे झालेले आहे. सदर कामाची चौकशी करुन योग्य रीत्या पुर्ण करावे अन्यथा मि स्वता ग्रामपंचायत पदाचा राजीनामा घेऊन आमरण उपोषणाला बसणार.” 
अमोल कातकर
माजी उपसरपंच तथा विद्यमान सदस्य ग्रामपंचायत कोठारी

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here