विरुर येथे छत्रपती शिवाजी महाराज जयंती साजरी

0
848

विरुर येथे छत्रपती शिवाजी महाराज जयंती साजरी

वंचित बहुजन आघाडीचा कार्यकर्ता मेळावा संपन्न

 

विरुर स्टे./राजुरा, 19 फेब्रु. : आज वंचित बहुजन आघाडीच्या वतीने विरुर स्टेशन येथे शिवजयंती साजरी करण्यात आली. यावेळी विरुर स्टेशन व विहिरगाव जिल्हा परिषद क्षेत्रातील कार्यकर्त्यांचा कार्यकर्ता मेळावा पार पडला. हा मेळावा कुणबी समाज सभागृह येथे आयोजित करण्यात आला. यावेळी मंचावर जिल्हाध्यक्ष भूषण फुसे, जिल्हा महासचिव धीरज बांबोळे, जिल्हा उपाध्यक्ष आनंदराव अंगलवार, जिल्हा सचिव रमेश लिंगमपल्लीवार, तालुकाध्यक्ष सुशील मडावी, गोंडपिपरी तालुका अध्यक्ष डॉ. तोहोगावकर, जिल्हा आयटीसेल प्रमुख अमोल राऊत आदी आसनस्थ होते.

यावेळी उपस्थित कार्यकर्त्यांशी संवाद साधतांना जिल्हाध्यक्ष भूषण फुसे यांनी प्रस्थापित सत्तापिपासू राज्यकर्त्यांनी वंचित समाज घटकांची कशाप्रकारे दिशाभूल केली यावर प्रकाश टाकला. तसेच ओबीसी आरक्षणाचे संरक्षण हे प्रथम कर्तव्य, जनगणना व त्यांचा राजकीय वाटा यासाठी वंचीत बहुजन आघाडी सातत्याने लढा लढेल. मुस्लिम समाजासाठी 5 टक्के आरक्षण अमलबजावणी तसेच महिला अत्याचार यावर आळा घालण्यासाठी अग्रगण्य भूमिकेत असल्याचेही सांगितले. तसेच प्रत्येक कार्यकर्त्यांनी अकोला पॅटर्न राबविण्यासाठी जनसंपर्क वाढवून संघटन मजबूत करावा. प्रस्थापितांची राजकीय मक्तेदारी संपविण्याचे प्रण कार्यकर्त्यांनी अंगी बाणली पाहिजे असे मत आपल्या संवादातून व्यक्त केले.

यावेळी जिल्हा महासचिव बांबोळे यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांना अंगीकारून रयतेचे राज्य आणण्यासाठी प्रयत्नरत राहावे असे सांगितले. जिल्हा उपाध्यक्ष अंगलवार यांनीही यावेळी उपस्थित कार्यकर्त्यांशी संवाद साधत सकारात्मक पक्ष बांधणी करावी असे सांगितले.

या कार्यकर्ता मेळाव्याला परिसरातील असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते. सदर मेळाव्याच्या समारोपानंतर मंचावर आसनस्थ पदाधिकारी यांनी गोंडपिपरी तालुक्यातील तोहोगाव व हेटी कडे प्रस्थान केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here