मंदाताई पडवेकर “मदर टेरेसा” पुरस्काराने सन्मानित
राजु झाडे
चंद्रपूर स्थित सामाजिक,राजकीय, साहित्यिक,सांस्कृतिक क्षेत्रात चौफेर घोडदौड करून आपल्या करायची छाप सोडणाऱ्या मंदाताई पडवेकर याना त्यांच्या सराहनिय कार्याची दखल घेत गुजरात मधील “के. एन. हुम्यांनीटी सोशल सर्व्हिस” या नामवंत संस्थेने हा “मदर टेरेसा वर्ल्ड पिस अवार्ड 2020 या प्रतिष्ठेच्या पुरस्काराने सन्मानित केले.
तसेच सध्या जगभर कोरोना ( कोविड-19) या रोगाची लागण मोठ्या प्रमाणात सुरू असून , त्याला रोखण्यासाठी समाजाच्या विविध स्तरातून प्रयत्न चालले आहे. असे असतानाही देखील समाजसेवी मंदाताई स्वतःच्या जीवाची पर्वा न करता अनेक संस्थांकडून समाजप्रबोधन व पीडितांना साहाय्य करत आहेत. त्यांच्या या स्तुत्य कार्याची दखल घेत विदर्भ , महाराष्ट्रच नवे तर संपूर्ण भारतातील मान्यवर संस्था, ट्रस्ट फौंडेशन द्वारा मंदाताई यांचा ऑनलाईन पद्धतीने गौरव केला. तसेच अनेक ठिकाणाहून सन्मानपत्र देऊन सन्मानित केले जात आहे.
आतापर्यंत भारताच्या कानाकोपऱ्यात सर्वच राज्य , शहर , गावातून मंदाताई याना (120) कोरोना योद्धा पुरस्कार प्राप्त झाले आहे. मंदाताई यांचे समाजाच्या विविध स्तरातून कौतुक होत आहे.