गडचांदूर नगरीत १९ फेब्रुवारी ला भव्य ओबीसी व शेतकरी परिषद

0
643

गडचांदूर नगरीत १९ फेब्रुवारी ला भव्य ओबीसी व शेतकरी परिषद

संविधान तज्ञ डॉ.अ‍ॅड.सुरेश माने यांची विशेष उपस्थिती

 

गडचांदूर: रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ३९२ व्या शिवजन्मोत्सव सोहळ्यानिमित्त ओबीसी समन्वय समिती व बळीराजा शेतकरी परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य ओबीसी व शेतकरी परिषदेचे आयोजन गडचांदूर नगरीत बालाजी सेलिब्रेशन हॉल येथे १९ फेब्रुवारीला केले असून सदर कार्यक्रमाचे स्वागताध्यक्ष म्हणून डाँ. पि.एस.खेकडे साहेब तर अध्यक्षस्थानी अशोक घुंगरूड सर असतील.

कार्यक्रमाला विशेष मार्गदर्शक म्हणून संविधान तज्ञ तथा सामाजिक व राजकीय विश्लेषक डॉ.अ‍ॅड. सुरेश माने साहेब असून ओबीसी आरक्षणाचे मारेकरी कोण ? या विषयावर विस्तृत मार्गदर्शन करणार आहेत. सोबतच सामाजिक – सहकार क्षेत्राचे अभ्यासक राजेंद्रजी वैद्य यांना पुनर्गठीत कर्ज प्रक्रियेमध्ये शेतकरी कर्जमाफीपासून वंचित हा विषय असून, ओबीसी संयोजक बळीराज धोटे हे शिवकालीन स्वराज्य व आजचे स्वातंत्र्य या विषयावर भाष्य करणार आहे. या सर्व मान्यवरांच्या उपस्थितीत सदर प्रबोधन कार्यक्रम होणार असून परिसरातील नागरिकांनी व शेतकऱ्यांनी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन ओबीसी समन्वय समिती व बळीराजा शेतकरी परिषदेच्या संयोजकांनी केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here