सम्यक विध्यार्थी आंदोलनातर्फे जिवती येथे भव्य स्कॉलरशिप बचाव परिषद!
दिनांक १३ फेब्रुवारी २०२२ रोजी जिवती येथील गोंडवाना कॉलेज येथे सम्यक विध्यार्थी आंदोलनामार्फत स्कॉलरशिप बचाव परिषदेचे आयोजन केले होते.
जिवती तालुका हा चंद्रपूर जिल्ह्यात ग्रामीण तालुका म्हणून ओळखला जातो. या तालुक्यामध्ये शिक्षणाच्या खूप समस्या निर्माण झाल्या आहेत. शासनाने कोरोना काळात ऑनलाईन शिक्षण पद्धती सुरु केली मात्र तालुक्यात ग्रामीण भागात नेटवर्क नसल्यामुळे विध्यार्थी शिकूच शकत नाहीत.
आज विद्यार्थ्यांची स्कॉलरशिप दोन तीन वर्षांपासून रोखली आहे. बसेस बंद असल्यामुळे विध्यार्थ्यांना येण्या जाण्यास खूप त्रास होत आहे. जातीच्या प्रमाणपत्रासाठी खूप जाचक अटी ठेवल्या आहेत. यामुळे सामान्य विध्यार्थी त्रासले आहेत.
खाजगी शिक्षण संस्थानी विद्यार्थ्यांची आर्थिक लूट चालवली आहे. व विद्यार्थ्यांची स्कॉलरशिप अडवण्यात येत आहे ती वाचवणियासाठी सम्यक विध्यार्थी आंदोलन जिवती यांच्या वतीने स्कॉलरशिप बचाव हक्क परिषद घेण्यात आली.
या परिषेदेला मुख्य मार्गदर्शक सम्यक विध्यार्थी आंदोलन चे जिल्हा अध्यक्ष धीरज तेलंग यांनी विध्यार्थ्यांच्या प्रश्नावर प्रकाश टाकला. प्रमुख पाहुणे म्हणून वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष भूषण फुसे प्रामुख्याने उपस्थित होते. यांनी विद्याथ्यांच्या प्रत्येक अडचणीत सहकार्य करण्याची हमी दिली. जिवतीतील विध्यार्थ्यांसाठी त्यांच्या शिक्षणासाठी आपण प्रसंगी जिल्हा अधिकाऱ्याला घेराव घालू , टॉवर साठी मंत्रालयात निवेदन देऊ अशी ग्वाही दिली.
तसेच स्वागताध्यक्ष सोमाजी गोंडाणे सर यांनी सुद्धा विध्यार्थ्यांच्या प्रश्नावर सम्यक विध्यार्थी आंदोलनाने काम करावे असे आव्हान केले. परिषेदेला तालुक्यातील शेकडो विधार्थी व पालक उपस्थित होते. अनेक मान्यवरांनि मनोगत व्यक्त करून शासनाच्या शिक्षण धोरणावर टीका केली. परिषेदेला मार्गदर्शक म्हनुन उपस्थित असलेले प्रा. बालाजी मोरे यांनी तालुक्यातील विद्यार्थ्यांचे प्रश्न सोडवणीसाठी उपाययोजना सुचविल्या. लोक स्वराज्य आंदोलनाचे युवा अध्यक्ष ऍड. दत्तराज गायकवाड साहेबांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रकाश जोंधळे उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक शुद्धोधन निखाडे यांनी केले. तर संचालन निधार्थ जिवाने यांनी केले तर आभार शुद्धोधन बनसोडे यांनी मानले व कार्यक्रमाची सांगता झाली.
परिषद यशस्वीतेसाठी दशरत गायकवाड, अमोल कांबळे, प्रेमकांत कांबळे, गणेश मेकाले, सुनिल पैठणे, अमर लहवराळे, राजरत्न कांबळे, अक्षय वाघवसे, संभाजी ढगे, राहुल सोनकांबळे, किशोर कांबळे, आकाश ससाणे, प्रवीण कांबळे, आत्तम वाघमारे विनोद क्षीरसागर यांनी यांनी मेहनत घेतली.