शरीर बिघडवणारे नव्हे, तंदुरुस्त होणारे केंद्र व्हावेत : आमदार सुधीर मुनगंटीवार

0
640
शरीर बिघडवणारे नव्हे, तंदुरुस्त होणारे केंद्र व्हावेत : आमदार सुधीर मुनगंटीवार
चंद्रपूर महानगरपालिकेच्या व्यायामशाळेचे भानापेठ येथे उद्घघाटन
21 व्या शतकात विज्ञानाची प्रगती होत असली तरी दुसरीकडे संस्काराची अधोगती होत आहे. राज्यात सध्या शरीर बिघडवणारे केंद्र महाविकास आघाडी सरकार उघडत आहे. हे केंद्र आता किराणा दुकानापर्यंत देखील पोहोचले आहे. यामुळे तरुण पिढी बरबाद होईल. समाजाला शरिर बिघडवणारे नव्हेतर तंदुरुस्त ठेवणाऱ्या केंद्राची गरज असल्याचे प्रतिपादन माजी वित्त नियोजन व वने मंत्री, लोकलेखा समिती अध्यक्ष आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी केले.
चंद्रपूर शहर महानगरपालिकेच्या माध्यमातून उभारण्यात आलेल्या भानापेठ येथील सुसज्ज व अत्याधुनिक व्यायाम शाळेचे उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. नगरसेवक संजय कंचर्लावार यांच्या संकल्पनेतून हनुमान मंदिराच्या वरच्या मजल्यावर महिला आणि पुरुषांसाठी व्यायाम शाळा उभारण्यात आली आहे.
 माजी वित्त नियोजन व वने मंत्री, लोकलेखा समिती अध्यक्ष आमदार सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते श्री भगवान हनुमान यांच्या मूर्तीची पूजा करून आरती करण्यात आली. दरम्यानच्या भानापेठ प्रकाशमय होण्यासाठी कोलबास्वामी चौक येथे हायमास्टचे लोकार्पण  पार पडले.
याप्रसंगी महापौर राखीताई कंचर्लावार यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमाला उपमहापौर राहुल पावडे, स्थायी समिती सभापती संदीप आवारी, भाजपचे जिल्हाध्यक्ष डॉ. मंगेश गुलवाडे, राजेंद्र कंचर्लावार, सभागृह नेता देवानंद वाढई, भाजपचे कोषाध्यक्ष प्रकाश धारणे, प्रभागातील नगरसेवक संजय कंचर्लावार, नगरसेवक राजेंद्र अडपेवार, नगरसेविका आशा आबोजवार, स्थायी समितीचे माजी सभापती रवी आसवानी, भाजपचे राजेंद्र खांडेकर आदींची उपस्थिती होती.
प्रास्ताविक नगरसेवक संजय कंचर्लावार यांनी केले. यावेळी त्यांनी आपल्या 20 वर्षांच्या कार्यकाळात जनतेसाठी केलेल्या विविध विकास कामांची माहिती दिली.
याप्रसंगी महापौर राखीताई कंचर्लावार म्हणाल्या, कोरोणाच्या काळामध्ये आपल्या शरीरातील हुमिनिती पॉवर वाढवण्यासाठी हलक्याफुलक्या व्यायामाची गरज आहे. कोरोणामुळे घराबाहेर पडता येत नव्हते, अशा वेळी घरच्या घरी देखील महिलांनी व्यायाम केले पाहिजे. आज सुसज्ज व्यायामशाळा सुरू झाल्याने आपले शरीर तंदुरुस्त करून घ्यावे, असे आवाहन देखील केले.
याप्रसंगी आमदार सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते संपदा विश्वेश्वर आबोजवार, निष्ठा पराग आबोजवार, राधीका संजय वाटेकर, अथर्व सुदर्शन बारापात्रे, खुशी इश्वर गेड़े आदि विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे संचालन स्वाती बेतावर यांनी केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here