विरुर येथील रास्तभाव दुकान सील असतांनाही धान्याचा वाटप

0
792

विरुर येथील रास्तभाव दुकान सील असतांनाही धान्याचा वाटप

तात्काळ प्राधिकारपत्र रद्द करण्याबाबतचा अहवाल

विरुर येथील रास्तभाव दुकानातून धान्य नेतांना

आवाळपुर : कोरपना तालुक्यातील विरूर (गाडेगाव) येथील रास्तभाव दुकानात मोठ्या प्रमाणात काळाबाजार सुरू असल्याने पुरवठा निरीक्षण अधिकारी मनिषा गंभीरे यांनी दिनांक ०३ फेब्रुवारी रोजी केलेल्या चौकशीत मोठ्या प्रमाणात काळाबाजार होत असल्याचे सकृतदर्शनी आढळून आले २६.५० किलो गहू व तांदळाचा अतिरिक्त साठा आढळून आला. विरुर येथील रास्तभाव दुकान सील करण्यात आले तहसीलदार कोरपना यांनी येथील रास्तभाव दुकान रद्द करण्याबाबतचा अहवाल तात्काळ जिल्हा पुरवठा अधिकारी चंद्रपूर यांच्याकडे पाठविला विरुर येथील रास्तभाव दुकान सील करण्यात आल्यावरही कुठलीही परवानगी न घेता अतिरिक्त आढळून आलेल्या धान्य साठय़ाची विल्हेवाट लावण्याकरिता येथील रास्तभाव दुकानदार राजू आत्राम व महादेव नागभिडकर यांनी रास्तभाव दुकानांतून धान्य परस्पर वाटप केल्याने राजु अत्राम यांच्यावर सक्त कारवाई करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.

मोठ्या प्रमाणात काळाबाजारी पुरवठा निरीक्षण अधिकारी मनीषा गंभीरे यांनी केलेल्या चौकशीत असे लक्षात आले की धान्याचा वाटप मूळ गावी न करता गाडेगाव येथून परस्पर विक्री केली जात होती. जानेवारी महिन्याचे धान्य न देताच घरोघरी जाऊन अंगठे घेण्यात आले.

शिधापत्रिकाधारकांकडून आगाऊ रक्कम वसुलल्या जात होती. अंत्योदय योजनेच्या शिधापत्रिका धारकांना ३५ किलोऐवजी २० किलो धान्य आगाऊ रकमेने देण्यात आले. धान्य उचल करतांना पावती देण्यात येत नव्हती. रास्तभाव दुकान दुसराच व्यक्ती चालवितो. २६.५ क्विंटल गहू व तांदूळाचा अतिरिक्त साठा आढळून आला. चौकशीची वेळी कुठलाही रेकॉर्ड उपलब्ध करून दिला नाही. चौकशीमध्ये अनेक गंभीर बाबी आढळून आल्याने तहसीलदार कोरपना यांनी येथील रास्तभाव दुकानदारावर कठोर कारवाई करण्याकरिता स्वयंस्पष्ट अहवाल तात्काळ जिल्हा पुरवठा अधिकारी यांना पाठविला आहे. विरूर गाडेगाव येथील रास्तभाव दुकान महादेव नागभिडकर हा व्यक्ती चालवीत होता. मागील दोन वर्षांत मोफतचे अनाज मिळत असल्याने जवळपास १००० क्विंटल धान्याची अफरातफर झाली असल्याने या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करून कठोर कारवाई करण्याची मागणी सरपंच सुभाष झाडे यांनी जिल्हाधिकारी चंद्रपूर यांच्याकडे केली आहेत.

मुजोरीने धान्य वाटप आज सकाळी रास्तभाव दुकानातून धान्यवाटप करण्यात आले. मला १५ किलो धान्य मिळाले १० ते ११ लोकांनी धान्य नेले. तहसिलदार यांचा फोन आल्यावर दुकानदाराने धान्य वाटप बंद केले. – सुभाष तातोबा अतकर
शिधापत्रिकाधारक

धान्य चोरीचा गोरखधंदा मागील दोन वर्षांपासून दारोदारी फिरून अंगठे घेऊन धान्य चोरीचा गोरखधंदा येथील दुकानदार करीत आहे चौकशी अधिकार्‍यांनी रास्तभाव दुकान सील केल्यावरही वाटप सुरु असल्याची माहिती मिळाली याबाबत तहसीलदार कोरपना यांना फोनवर माहिती दिल्यानंतर धान्य वाटप बंद झाला अतिरिक्त आढळून आलेल्या धान्य साठय़ाची परस्पर विल्हेवाट लावण्याकरिता दुकानदार मुजोरी करून धान्य वाटप करीत आहे. – सुभाष दाढे, सरपंच, विरुर

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here