वं. राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचा 53 वा पुण्यस्मरण तथा सर्वसंत मानवता स्मृति दिवस कार्यक्रम
चंद्रपूर(प्रति)- अ.भा.श्री गुरुदेव सेवा महिला व पुरुष सेवाश्रम हिंग्लाज भवानी वार्ड येथे दि. 6 फेबु्रवारी ते 8 फेबु्रवारी 2022 ला मानवतेचे महान पूजारी श्री तुकडाजी महाराजाचा 53वा पुण्यस्मरण तथा सर्वसंत मानवता स्मृती दिवस अनेकविद कार्यक्रमाच्या माध्यमातून साजरा करण्यात आला.यात दररोज सामूदायीक ध्यान, तिर्थस्थापणा महिला मंडळाचे भजन संमेलन, सांय.सा.प्रार्थना हभप केशवराव खिरटकर महाराज रा.डोंगरगाव यांचे प्रबोधनपर किर्तन, किर्तन कार्यक्रमाचे उद्घाटन ग्रामगीताचार्य, जि. प्रचार प्रमुख दादाजी नंदनवार प्रमुख मार्गदर्शक उपमहापौर राहूल पावडे उपस्थितीत होते. मधूमेह व रक्तदाब शिबिराचे आयोजन करण्यात आले. समारोपिय कार्यक्रमाचे दिवशी नगरातून रामधून काढण्यात आली. हभप नामदेवराव बावणे महाराज यांचे काल्यावर किर्तन, 4.58 मिनिटांनी राष्ट्रसंताना भावपूर्ण श्रध्दांजली, अनाथाची आई सिंधुबाई सपकाळ, गानसम्राज्ञी लतादिदी मंगेशकर यांना भावपूर्ण श्रध्दांजली वाहण्यात आली. श्रध्दांजली कार्यक्रमाचे संचालन राजेंद्र आखरे तथा चमूनी केली. सा.प्रार्थनेच्या महत्वावर जि.सेवाधिकारी अॅड दत्ताभाऊ हजारे, अनिल तुंगीडवार, सौ.मंगला आखरे नगरसेविका यांनी मार्गदर्शन केलेे. शेवटी आरती, राष्ट्रसंदना व महाप्रसादाने कार्यक्रमाची समाप्ती करण्यांत आली कार्यक्रमात मंडळचे वतीने कार्यकर्त्याचे शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ देवून सत्कार करण्यात आले.कार्यक्रम यशस्वी करण्याकरीता रमेश धोटे राजू हुसे, बापूजी बोबडे, बाबुराव झुरमुरे, बंडू चौधरी, परसुराम कामडी, भाऊराव ढोके, जनार्दन क्षिरसागर अशोक खारटकर, तुकाराम खारटकर, अशोक नंदनवार, मिथून रोहनकर, विनोद भोयर, वसंता वांढरे, वसंता कन्नाके, लिलाबाई पोटदुखे, लिलाबाई कवडे, प्रमिला कामडे, लताबाई तेल्हाडे, छबुताई लेडांगे, राजश्री पोटदुखुे, शोभा सोमलकर , संगिता रमेश पोथले संचालन सरोज चांदेकर इत्यादी महिला व पुरुष कार्यकर्त्यांनी अथक परिश्रम केला.