सामाजिक सौहार्द बिघडवणाऱ्या समाजकंटका वर कारवाई करण्यात यावी…!

0
731

सामाजिक सौहार्द बिघडवणाऱ्या समाजकंटका वर कारवाई करण्यात यावी…!

सम्यक विद्यार्थी आंदोलन जिल्हा चंद्रपूर यांची जिल्हाधिकारी मार्फत मुख्यमंत्री यांच्याकडे निवेदनातून मागणी

 

चंद्रपूर, १० फेब्रु. : कर्नाटकामधील हिजाब विरोधी आंदोलन महाराष्ट्रातील शैक्षणिक संस्था विद्यापीठांतून पसरवून सामाजिक सौहार्द बिघडवणारे समाजकंटक यांच्यावर कारवाई करण्याच्या आशयाचे निवेदन अप्पर जिल्हाधिकारी विशाल कुमार मेश्राम यांच्यामार्फत मुख्यमंत्री यांना पाठविण्यात आले. सदर मागणीचे निवेदन आज जिल्हाधिकारी कार्यालय चंद्रपूर येथे देण्यात आले.

सम्यक विद्यार्थी आंदोलन ही विद्यार्थी संघटना शैक्षणिक क्षेत्रात विद्यार्थ्याला भेडसावणारे प्रश्न यांसाठी काम करणारी संघटना आहे. देशात विशेषतः ऊत्तरप्रदेशातील निवडणुकीत एका धर्मांध पक्षाला मतदान व्हावे म्हणून कर्नाटक मधील काही कॅालेजमध्ये हिजाब विरोधी आंदोलन करून शिक्षणाला हिंदू-मुस्लिम करन्याचा प्रयत्न चालू आहे. अल्पसंख्यांकांच्या वर्गाला टार्गेट करून त्यांच्या जीवन पध्दतीवर हल्ले करन्याचा प्रयत्न काही धर्मांध शक्ती कडून केला जात आहे. मुस्लिम समाजातील मुलींचे शिक्षणाचे प्रमाण कमी आहे. त्यांची शैक्षणिक स्थिती SC/ST वर्गापेक्षा कमी आहे. अशा स्थितीत गरिब मुस्लिम पालक आपल्या मुलींना अल्पसंख्यांकांच्या संस्था असतील किंवा ईतर धर्मियांनी संस्थांनी चालविलेल्या संस्था असतील त्या ठिकाणी या मुली शिक्षण घेत आहेत. त्यांच्या जीवीताचे, त्यांच्या अधिकाराचे संरक्षण करणेचे काम आपण जिल्हाधिकारी वडील म्हणून आपले आहे. म्हणून जिल्ह्यातील शैक्षणिक संकुलातील वातावरण दूषित होऊ नये म्हणून पोलिस प्रशासनाशी बोलून जिल्हयात शांतता व सौहार्द राहील याची चोख व्यवस्था ठेवणे आपले परमकर्तव्य आहे. केरळ सारख्या राज्यांत मोठ्या प्रमाणावर मुस्लिम भगिनी त्यांच्या हिजाबमध्ये शिक्षण घेत असताना आंदोलन भाजपशासित राज्यातून सुरू होऊन ईतर राज्यांत जाणीवपूर्वक पसरविले जात आहे. त्याला राज्यांच्या सीमेवर थांबविणे आपले शासन म्हणून काम आहे. ते आपण कराल आणि राज्यातील शांतता भंग होणार नाही, याची काळजी घ्याल अशी विनंती करून निवेदन देण्यात आले.

यावेळी सम्यक विद्यार्थी आंदोलन चंद्रपूरचे जिल्हा अध्यक्ष धिरज तेलंग यांच्या नेतृत्वात या मागणीचे निवेदन देण्यात आले. यावेळी सम्यकचे प्रशांत कांबळे, नरेश आलम नागराज कांबळे, मयुर डांगे, अॅड. क्षितिज मेंढे, कबीर रामटेके, प्रफुल वासनिक इत्यादी यांची उपस्थिती होती

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here