आवाळपुर ग्रामपंचायत सदस्याच्या नविन गाडीच्या फोडल्या काचा
समाजकंटकाचे घृणास्पद कृत्य
आवाळपुर : आवाळपुर ग्रामपंचायतीची सार्वत्रिक निवडणूक २०२१ मध्ये झाली. या निवडणूकीत कल्पतरु बबन कन्नाके हा नवयुवक उभा होता. युवकांची प्रंचड फौज याचे मागे उभी राहली प्रस्थापित उमेदवाराचा पराभव करून कल्पतरुचा मोठा विजय झाला. ग्रामपंचायत सदस्य निवडून आल्यानंतर कल्पतरू याने गावात समाजकार्यात व विकासकामात लक्ष देऊन नागरिकांच्या अनेक समस्या मार्गी लावल्या आवारपूर गावात कल्पतरुचे नाव चांगलेच गाजत आहे. कल्पतरु याचे वडील बबन कन्नाके हे एसटी महामंडळात अधिकारी होते काही महिन्यांपूर्वी ते निवृत्त झाले. निवृत्तीनंतर कल्पतरू कन्नाके याने नेक्सा कंपनीची बेैलेनो गाडी घेतली. कल्पतरू कन्नाके यांच्या घराचे नूतनीकरणाचे काम सुरू असल्याने कल्पतरू याची बेलेनो गाडी त्याचा मित्र स्वप्नील मुंगूल याचे घरी लावून होती. दिनांक ३ फेब्रुवारीला रात्रीच्या वेळेला समाजकंटकांनी गाडीच्या मागील काचा फोडण्यात आल्या कल्पतरूचा राजकारणातील वाढता सहभाग गावात वाढत असलेली ख्याती यामुळे येथील समाजकंटकांकडून असे घाणेरडे कृत्य करून काचा फोडल्या असल्याच्या चर्चा गावात आहेत गावातील व्यक्ती कडून असले घृणास्पद कार्य केली जाण्याची शक्यता नागरिकांनी वर्तविली असुन याबाबत अद्याप पावेतो पोलिसांत तक्रार दिलेली नाही.