प्रजापिता ब्रम्हकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालयच्या उपक्रमांचे काम कौतकास्पद! – नगराध्यक्ष दुर्गाताई तांबे

0
835

प्रजापिता ब्रम्हकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालयच्या उपक्रमांचे काम कौतकास्पद! – नगराध्यक्ष दुर्गाताई तांबे

अहमदनगर
संगमनेर ८/२/२०२२
(प्रतिनिधी ज्ञानेश्वर गायकर पाटील)
भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव निम्मित संगमनेर येथील ज्ञानपीठ प्रजापिता ब्रम्ह कुमारी ईश्वरीय विश्व विद्यालयात विविध कार्यक्रमांचे नियोजन करण्यात आले होते. यात देशाकरिता वीरगती प्राप्त वीरांच्या परिवाराचा भावार्थ सत्कार , सीमेवर लढणाऱ्या सैनिकांच्या परिवाराचा सत्कार, ज्यांनी सीमेवर लढून निवृत्ती घेतली त्या परिवाराचा सत्कार करण्यात आला. लतादीदी यांच्या आवाजातील गीत सादर करून बालकलाकार यांनी लतादीदी यांना श्रद्धांजली वाहिली.
प्रारंभी पुणे येथील मिरा सोसायटी ब्रम्ह कुमारी प्रजापिता ईश्वरीय विश्व विद्यालय संचालिका नलानी बहीण जी यांचे ” ज्ञानमार्ग प्राप्ती” बाबत प्रवचन झाले . ज्ञान व कौशल्य मनुष्याला सदृढ , ज्ञानी बनवते व या मधूनच आपली प्रगती होत राहते या बाबत त्यांनी सखोल मार्गदर्शन केले.

प्रजापिता ब्रम्ह कुमारी ईश्वरीय विश्व विद्यालय द्वारा विविध प्रकारचे उपक्रम म्हणजे ज्ञान आत्मसात करण्याचे अमुल असे काम आहे. मला या बाबत नेहेमीच अभिमान वाटतो,असे उदगार या प्रसंगी संगमनेर नगरपालिकेच्या अध्यक्षा सौ दुर्गा ताई तांबे यांनी मार्गदर्शन करताना सांगितले. वीर पत्नीचा सन्मान ही अभिमानाची बाब असून, त्यांनी या वेळी स्वर्गीय भाऊसाहेब थोरात यांच्या स्वातंत्र चळवळीच्या कार्याचा भाऊक आढावा घेतला .ब्रम्ह कुमारी ईश्वरीय विश्व विद्यालय ला कायम मदत करू असे आश्वासन ही त्यांनी दिले .

या प्रसंगी वीरगती प्राप्त परिवाराचे त्यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. विरपत्नी श्रीमती सुजाता अण्णासाहेब कवडे, वीर पत्नी श्रीमती सुरेखा रोहिदास मोरे व परिवार यांचा सह सीमेवरील लढणारे सेवा निवृत्त सैनिक दत्तात्रय गवांदे, सोमनाथ गांडोळे , भारत कुटे, गोरक्ष गडाख आदी सैनिकांचा सन्मान करण्यात आला.

या कार्यक्रमास महिला काँग्रस राज्य सर चिटणीस निर्मलाताई गुंजाळ , अर्चना बहीणजी, ज्योती बहीणजी, ज्येष्ठ पत्रकार किशोर कालडा , पत्रकार संघाचे अध्यक्ष संजय नवले, ज्येष्ठ उदोजग सुभाष गुंजाळ, अनिता दिदी, रामनाथ आरोटे ,प्राध्यापक रोहिणी कासार , विष्णुभाई उंबरकर , ज्ञानेश्वर गायकर पाटील, परशुराम भाई जोंधळे आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक अनिता बहीण जी यांनी केले,तर सूत्र संचालन रामनाथ भाई आरोटे यांनी व आभार ज्याती बहीण जी यांनी मानले. या प्रसंगी गान सम्राज्ञी लता दीदी यांना सभागृहाने भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली. लता दीदी यांच्या मेरे वतन के लोगो या भावपूर्ण देशगीत ,गायन बाल कलाकार यांनी गायीले. विरपत्नि श्रीमती सुजाता अण्णासाहेब कवडे यांनी ब्रम्ह भोजन दिले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here