विविध कार्यकारी सहकारी संस्थेच्या निवडणूक

0
1014

विविध कार्यकारी सहकारी संस्थेच्या निवडणूक

● सहकार क्षेत्रातील नामांकित संस्था 

● प्रस्थापितांची प्रतिष्ठा पणाला 

 

कोठारी, राज जुनघरे
बल्लारपूर तालुक्यातील सहकार क्षेत्रात नामांकित आणि प्रतिष्ठेची मानल्या जाणारी आणि शेतकऱ्यांचे आश्रय स्थान असणारी कोठारी येथील विविध कार्यकारी सहकारी संस्थेचा निवडणूक कार्यक्रम सन २०२१-२२ ते २०२५-२०२६ या कालावधीसाठी जाहीर करण्यात आलेला आहे. निवडणूकीच्या तारखा जाहीर होताच व अनुसूची प्रसिद्ध होताच सहकार क्षेत्रातील दिगज कामाला लागले आहेत.

अनुसुची उपविधी नुसार मतदार संघ निहाय निवडून द्यावयाची सदस्य संख्या १३असून सर्वसाधारण खातेदार कर्जदार प्रतिनिधी गटातून ०८, अनुसुचित जाती/ जमाती गटातून ०१ , इतर मागास वर्गीय गटातून ०१ , विमुक्त जाती/ भटक्या जमाती/ विशेष मागास प्रवर्ग गटातून ०१ , महिला राखीव गटातून ०२ अनुचीनूसार प्रतिनिधी निवडून द्यावयाची आहेत. मतदान ६ मार्च रोजी व मतदानानंतर लगेच त्याच दिवशी मतमोजणी आणि निकाल जाहीर करण्यात येणार आहे. उमेदवारांची अंतिम यादी व निवडणूक चिन्ह वाटप २३ फरवरी पर्यंत आहे. अल्पावधीतच निवडणुकीची घोषणा झाल्याने प्रस्थापित आणि प्रतिस्पर्धी ची दमछाक होत आहे. यात प्रस्थापितांची प्रतिष्ठा पनाला लागली आहे हे मात्र निश्चित, कृषी कर्ज वाटपात विविध कार्यकारी सहकारी संस्था अग्रेसर असली तरी सभासद शेतकरी हिताच्या योजना राबविण्यात सदर संस्था हतबल ठरली, यात शेतकऱ्यांचा होत असलेला भ्रमनिरास या निवडणुकीच्या निमित्ताने समोर येवू लागलेला आहे. प्रस्थापितांनी आजतागायत सहकार क्षेत्र काबिज करुन शेतकरी हिताच्या योजनांना बगल दिली आहे. या संस्थांच्या, क्षेत्राच्या व शेतिपूरक विकासासाठी नाबार्ड कडून मोठ्या प्रमाणात निधी येत असतो, मात्र सदर निधी विकासात्मक आणि शेतीपूरक कामासाठी कुठलीही खातरजमा न करता वापरल्या जात असल्याची खंमंग चरच्या विरोध मधून उमटत आहे. नामांकित आणि प्रतिष्ठेची विविध कार्यकारी सहकारी संस्थेच्या निवडणूक चे बिगुल वाजले असतांना निवडणुकीच्या तोंडावर अनावधानाने चर्चेचा खल निर्माण होतो आहे. सदर निवडणूक अटितटीची होणार की प्रस्थापितांना हादरा बसणार हे येणारा मतदानानंतरचा काळच सांगेल. प्रस्थापितांना शह देण्यासाठी व त्यांच्या काबिज क्षेत्रावर आपले अस्तित्व निर्माण करण्यासाठी विरोधकांनी कंबर कसली असून प्रस्थापितांच्या गटाला सुरुंग लावण्यासाठी सज्ज झाले आहेत. अस्तित्व सांभाळण्यासाठी दिग्गज कामाला लागले असून कोठारी, मानोरा, पळसगांव, कवडजई, काटवली, बामणी, आमळी व अन्य गावात गटागटाने मोर्चेबांधणीस वेग आलेला आहे. अंतिम यादी जाहीर होताच पुढील वेध स्पष्ट होतील हे विशेष…!

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here