उद्या रामपुरवाशीयांचे वेकोली मुख्य महाप्रबंधक कार्यालया समोर एक दिवसीय धरणे आंदोलन
राजुरा : रामपूर वासीय नागरीकांच्या विविध समस्येचे निराकरण करण्यासाठी वेकोली विरोधात (दि. ३) एक दिवसीय धरणे आंदोलनात सहभागी होण्याचे आव्हान रामपूर येथील सरपंच वंदना गौरकार यांनी केले आहे.
रामपुरच्या नागरिकांनी अनेकदा निवेदन देऊन वेकोली प्रशासनाचे लक्ष वेधले आहे.पण अधिकारी मात्र याकडे दुर्लक्ष करीत असल्याने जनतेत रोष दिसून येत आहे. वेकोली प्रशासनाने पुनर्वसित रामपूर वासीयांना हक्काचे पट्टे मिळणे देणे, गावातील रस्ते नाल्या बनवून मुख्य चौकाचे सौदर्यीकरण करणे व रामपूर झोपडपट्टी वासीयांना घरकुल योजनेचा लाभ मिळण्यासाठी पुनर्वसित वस्ती व खाली जागा ग्रामपंचायत ला लवकरात लवकर हस्तांतरित करून देणे यासह ग्रामपंचायत रामपूर द्वारा वारंवार कराची मागणी करून सुद्धा आजपावेतो कर भरलेला नसल्याने लवकरात लवकर भरावा करावा,
रामपूर येथे 90% प्रतिशत कामगार व प्रकल्पग्रस्त लोक रहिवासी असल्यामुळे बल्लारपूर क्षेत्र वेकोली द्वारा मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी प्रतिवर्षं 1 कोटी CSR फंड देण्यात यावे, वेकोली द्वारा उत्पादित कोळशावर प्रति टन 400 रुपये स्वच्छता कर शासनाला जात असतो आणि खराब रस्ते , प्रदूषण.आरोग्य यांचा त्रास या परिसरातील जनतेला सोसावा लागतो त्या करिता या परिसरात या सोइ सुविधा उपलब्ध करण्यासाठी कमीत कमी या जाणाऱ्या रकमेपैकी 10% प्रतिशत रक्कमेचा वाटा मिळावा,धोपटाला ते रामपूर टी पाइन्ट आणि टी पाइन्ट ते माता मंदिर पर्यंत सिमेंट कॉक्रेट रोड (डीवायडर) बनवून पाथदिवे लावणे आदी मागण्याच्या पूर्तता करण्याकरिता (दि. ३) एक दिवसाचे धरणे आंदोलन करण्यात येत असल्याने या करीता गावकऱ्यांनी उपस्थित राहावे असे आव्हान सरपंच सौ वंदना गौरकार यांनी केले आहे.