९१० रुग्णांनी घेतला मोफत आरोग्य शिबिर व औषध वितरणाचा लाभ

0
682

९१० रुग्णांनी घेतला मोफत आरोग्य शिबिर व औषध वितरणाचा लाभ

आशिष देरकर यांचा पुढाकार

 

कोरपना – राष्ट्रसंत युवा मंडळ बिबी यांच्या वतीने व क्राईस्ट मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल, चंद्रपूर यांच्या सौजन्याने जिल्हा स्मार्ट ग्राम बिबी ग्रामपंचायत हद्दीत येणाऱ्या बिबी, धामणगाव, नैतामगुडा व आसन (बु) अशा चार ठिकाणी मोफत आरोग्य तपासणी व मोफत औषधी वितरण शिबिर नुकतेच पार पडले. सदर शिबिराचा एकूण ९१० रुग्णांनी लाभ घेतला.
ग्रामपंचायत बिबीचे माजी उपसरपंच आशिष देरकर यांच्या पुढाकारातून चारही शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. २७ जानेवारीला बिबी व धामणगाव येथे तर २८ जानेवारीला आसन बु. व नैतामगुडा येथे शिबीर पार पडले. त्यानुसार बिबी येथे ४९०, धामणगाव येथे १९५, आसन बु., गेडामगुडा येथे ११० व नैतामगुडा येथे ११५ अशा एकूण ९१० रुग्णांची तपासणी करून मोफत औषध पुरवठा करण्यात आला.
सध्या ताप, सर्दी, खोकला या आरोग्यविषयक समस्यांनी गावागावात थैमान घातले असून या शिबिराचा गावकऱ्यांना चांगलाच लाभ झाला. शिबिरासाठी क्राईस्ट मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल, चंद्रपूर येथील डॉ. मिथून गोवर्धन, डॉ. मृण्मयी कोरेवार, आनंद डोंगरे, सुदेश शंभरकर, संध्या घुरले, चंदा चांदेकर, आकाश उमरे, हिमांशू कांबळे, जोसेफ कुरियन, पॉल पौलॉस आदींनी सहकार्य केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here