आमदार किशोर जोरगेवार यांची कोरोनावर मात, उद्या कोव्हिड सेंटरची पाहणी करून घेणार परिस्थितिचा आढावा
कोरोनाची लागण झाल्याने आमदार किशोर जोरगेवार यांच्यावर उपचार सुरु होते. अखेर त्यांनी कोरोनावर मात केली असून उद्या पासून पुन्हा ते नागरिकांच्या सेवेसाठी सज्ज होणार आहे. उद्या सकाळी 9 वाजता ते चंद्रपूर येथील कोव्हिड सेंटरची पाहणी करणार असून तेथील उपाययोजनांची माहिती घेणार आहे. तर 11 वाजता पासून नागरिकांना भेटण्यासाठी जनसंपर्क कार्यालयात उपलब्ध असणार आहे. मात्र अत्यावश्यक कामा करिताच नागरिकांनी यावे, नागरिकांनी गर्दी न करता सामूहिक अंतर पाळावे असे आवाहनही त्यांनी केले आहे.
चंद्रपुरात कोरोना बाधितांचा आकडा झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे परिस्थिती आटोक्या बाहेर जाण्याची भीती वर्तवली जात आहे. दरम्यानच्या काळात चंद्रपूर विधानसभा क्षेत्राचे आमदार किशोर जोरगेवार हे कोरोनाबाधित निघाल्याने त्यांच्यावर उपचार सुरु होता. मात्र आता ते कोरोनामुक्त होताच त्यांनी कोरोना रुग्णांना योग्य सोयीसुविधा उपलब्ध करून देण्याकडे लक्ष केंद्रित केले आहे. उद्या ते सकाळी 9 वाजता चंद्रपूर कोव्हिड सेंटरची पाहणी करणार असून येथील उपाय योजनांचा आढावा घेणार आहे. तर सकाळी 11 वाजता पासून आमदार किशोर जोरगेवार हे त्यांच्या जैन भवन जवळील जनसंपर्क कार्यायलात विधानसभा क्षेत्रातील नागरिकांच्या समस्या जाणून घेण्यासाठी उपलब्ध राहणार आहे. मात्र अत्यावश्यक काम असल्यासच नागरिकांनी बाहेर पडावे, असे आवाहनही आमदार किशोर जोरगेवार यांनी केले आहे.