अद्भुत…! कोंबडीच्या पिलाला चार पाय
गडचिरोली : ‘निसर्गाची किमया‘ हा शब्द आपण नेहमी आश्चर्यकारक घटनांसाठी वापरत असतो. काहीतरी वेगळे घडले की सर्व जनतेला ते पाहण्याची आवड शिगेला पोहचलेली असते.
अशीच एक अद्भुत घटना गडचिरोली शहरातील हनुमान वॉर्ड आठवडी बाजार येथील अनंता सोनगलवार यांच्या घरी घरी नागकिरांना अनुभवयास मिळाली. आणि ते बघण्यासाठी नागरिकांची चक्क गर्दी जमली.
त्यांच्या घरगुती पाळीव कोंबडीने बारा अंडी दिली. त्यामधून दहा अंडी उबविली असता नऊ पिल्ले सामान्य तर दहावे पिल्लू चार पाय घेऊन जन्माला आले. चार पायाचे पिल्लू पाहण्यासाठी जमलेली गर्दी आश्चर्य चकित झाली, हे विशेष…!