गोंदेडा तपोभूमी चे अपूर्ण कामे पूर्ण होणारचं-आमदार बंटी भांगडीया
गोंदेडा गुंफा यात्रेत गुरुदेव भक्तांनी मास्क लावून लावली हजेरी
चिमूर : वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या पद स्पर्शाने पावन झालेल्या गोंदेडा गुंफा यात्रा कोरोना नियमांचे पालन करीत राष्ट्रसंत तुकडोजी महाराज पुण्यतिथी महोस्तवाच्या समारोपीय कार्यक्रमात आमदार बंटी भांगडीया यांनी तपोभुमीतील भक्तनिवास व इतर अपूर्ण काम संदर्भात शासन निधी देत नसल्याने ती कामे अपुर्ण आहे. परंतु अपूर्ण कामे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज आपल्या सहकार्याने पूर्ण करतील अशी ग्वाही देत कोरोना तिसरी लाट असल्याने नागरिकांनी कोरोना नियमांचे पालन करण्याचे आवाहन केले.
तपोभूमीत खासदार अशोकजी नेते , माजी आमदार मितेशजी भांगडीया, आमदार बंटी भांगडिया यांनी येऊन महाराजांच्या
अधिष्ठानचे दर्शन घेऊन नमन केले.
गोपालकाला प्रसंगी खासदार अशोक नेते,माजी आमदार मितेश भांगडीया, आमदार बंटी भांगडीया ,वसंत वारजूकर, डॉ श्याम हटवादे, राजु देवतळे, राजू पाटील झाडे ,विवेक कापसे , विनोद चोखरे, पस सभापती लता पिसे, जीप सदस्य गजानन बुटके, जीप सदस्य मनोज मामीडवार ,जीप सदस्य ममता डुकरे, मायाताई ननावरे ज्योती ठाकरे गिरीश भोपे आदी गुरुदेव भक्त उपस्थित होते.
दरम्यान ग्रामसफाई , ध्यान प्रार्थना, रामधून ,भजन संध्या, महिला सक्षमीकरण, युवक मेळावा कीर्तन आदी कार्यक्रम कोरोना नियमांचे पालन करून करण्यात आले. शेकडो गुरुदेव भक्तांनी मास्क लावून गुंफा यात्रेत हजेरी लावली.राष्ट्रवंदना व जय घोषणे महोस्तव ची सांगता झाली.