राष्ट्रीय युवा दिनानिमित्त आयोजित प्रचार व्हॅनचे महापौरांच्या हस्ते उद्घाटन
चंद्रपूर/प्रतिनिधी
भारत सरकारच्या माहिती व प्रसारण मंत्रालयांतर्गत कार्यरत प्रादेशिक जनसंपर्क कार्यालय, वर्धा यांच्या वतीने चंद्रपूर शहरात राष्ट्रीय युवा दिनानिमित्त आयोजित जनजागृती व्हॅनचे 12 जानेवारी 2022 रोजी महानगरपालिका मुख्य कार्यालयासमोर महापौर राखी कंचर्लावार यांच्या हस्ते हिरवी झेंडी दाखवून उद्घाटन करण्यात आले.
25 व्या राष्ट्रीय युवा महोत्सवाच्या निमित्त “सक्षम युवा आणि सशक्त युवा” हे ब्रीद घेऊन क्षेत्रीय लोकसंपर्क ब्यूरो वर्धा तसेच सूचना व प्रसारण मंत्रालय भारत सरकारच्या वतीने ‘आजादी का अमृत महोत्सवा’च्या औचित्य साधून जनजागृती अभियान राबविण्यात येत आहे.
महापौर राखी कंचर्लावार यांच्या हस्ते नारळ फोडून व हिरवी झेंडी दाखवून यांचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी सभागृह नेता देवानंद वाढई माजी महापौर अंजली घोटेकर, नगर सेविका संगीता खांडेकर, डॉ. भारती दुधानी, राजेंद्र खांडेकर, सुशील सहारे यांची उपस्थिती होती. हे जनजागृती व्हन चंद्रपूर शहरातील विविध भागात फिरून कोरोनासंदर्भात लोकांना जागृत करणार आहे.