एकलव्य कनिष्ठ महाविद्यालय वरोडा येथे आरोग्य विभागातर्फे covid -19 लसीकरण संपन्न

0
913

एकलव्य कनिष्ठ महाविद्यालय वरोडा येथे आरोग्य विभागातर्फे covid -19 लसीकरण संपन्न

 

वरोडा : नुकताच आरोग्य विभाग कढोली ( खु ) यांचे मार्फत covid -19 यांच्या वतीने एकलव्य कनिष्ठ महाविद्यालय वरोडा येथे अकरावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांचे covid – 19 लसीकरण करण्यात आले. मुख्य अतिथी म्हणून सरपंच वनमालाताई कातकर, उपसरपंच दिनेश करमनकर व संस्थेचे अध्यक्ष प्रा. अनिल पोडे यांची विशेष उपस्थिती होती.
लसीकरण मोहिमेत नोडल अधिकारी म्हणून प्राचार्य कु. पौर्णिमा वडस्कर यांच्या निगराणीत लसीकरण पूर्ण करण्यात आले. लसीकरण मोहिमेत उपप्राचार्य प्रा. दिनेश घागरगुंडे, पर्यवेक्षिका कोमल काळे, कढोली आरोग्य विभागाचे अधिकारी डॉ. दुधे, डॉ. अक्षय बुर्लावर, आरोग्य सेविका वैशाली आसमपलीवार, ढोके मॅडम, गोगुलवार मॅडम, आरोग्य सेवक,बावणे सर, अंगणवाडी सेविका, सुचिता देठे, आशा वर्कर सुरेखा बोढे कढोली आरोग्य विभागाचे सर्व आरोग्य विभाग कर्मचारी तसेच कॉलेज चे सर्व प्राध्यापक वृंद, शाळेचे सर्व शिक्षक वृंद, शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी सहकार्य केले. यावेळी सर्व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here