डॉ. बाबासाहेब आंबेडकर तालुकास्तरीय सामान्य ज्ञान स्पर्धेचे बक्षीस वितरण
नेचर फाउंडेशनचा जिल्ह्यातील पहिलाच उपक्रम
तालुका प्रतिनिधी/चिमूर
नेचर फाउंडेशन,नागपूर यांच्या सौजन्याने डा. बाबासाहेब आंबेडकर तालुकास्तरीय सामान्य ज्ञान परीक्षा आयोजित करण्यात आली. होती.तालुक्यातील ३२ शाळांमधील २००० विद्यार्थ्यांनी यात सहभाग घेतला होता.वडाळा(पैकू)येथील बुद्धविहारात या स्पर्धेचे बक्षीस वितरण पार पडले.
या प्रसंगी उपसरपंच आदित्य वासनिक, स्वराज्य बांधकाम कामगार संघटनेचे धनराज गेडाम, ग्रामदर्शन महाविद्यालयाचे प्राचार्य सदाशिव मेश्राम, निवृत्त शिक्षक सुधाकर लोणारे, सुखारे, गणवीर,नेचर फाउंडेशन चे निलेश नन्नावरे उपस्थित होते.
या कार्यक्रमाची सुरुवात महामानवांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून करण्यात आली. कोविड महामारीमुळे सुमारे दोन वर्षे शाळा बंद होत्या परिणामी विद्यार्थी अभ्यासपासून दुरावले होते. अभ्यासाची आवड निर्माण व्हावी म्हणून प्रथमताच या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. फाउंडेशनच्या आगामी काळातील वाटचाली संदर्भात जाहीर जाहीर करण्यात आलं. याचा परिसरातील विद्यार्थ्यांनी लाभ घ्यावा असं आवाहन सचिव निलेश नन्नावरे यांनी केलं.या वेळी इतर मान्यवरांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलं.
या स्पर्धेत रुचिता नन्नावरे (महालगाव), दीक्षांत ठाकरे (चिमूर), पूजा भाणारकर (मोठेगाव), निशा धारणे, आचल दडमल व प्रत्येक सहभागी शाळेतील विद्यार्थ्यांना प्रोत्साहनपर बक्षीस मान्यवरांच्या हस्ते वितरित करण्यात आले.
या कार्यक्रमाचे संचालन समीक्षा नन्नावरे,तर आभार अस्विनी नन्नावरे यांनी मानले. या कार्यक्रमास शेकडो विद्यार्थी उपस्थित होते.