ग्रामीण भारत महीला गृह उद्योग मंडळातर्फे मोफत रोगनिदाण शिबीर संपन्न
दि.09/01/2022 ला राजाभाऊ खोब्रागडे सभागृह, बाबुपेठ चंद्रपुर या स्थळी मोफत रोगनिदान शिबीराचे ग्रामीण भारत महिला गृह उद्योग मंडळच्या वतीने भव्यदिव्य आयोजन करण्यात आले. हा कार्यक्रम सामाजीक दायीत्व म्हणुन जनतेच्या आग्रहास्तव पार पडला. शेकडोच्या संख्येनी मोफत शिबीराचा लोकांनी लाभ घेतला. प्रत्येक नागरिकांचे रोगनिदाण झाले, कार्यक्रमात लाभलेले प्रमुख उपस्थितीत “मानवटकर मल्टिस्पेशालीटी” हाॅस्पीटलच्या मुख्य डाॅ. माधुरी मानवटकर यांनी रुग्णांचे रोगनिदान केले.सदर कार्यक्रमाचे संचालन मा.प्रशिल भेसेकर यांनी केले, या शिबीराकरीता उपस्थित मान्यवर डाॅ. उल्हास बोरकर (अस्थिरोग), डॉ. संपदा दिक्षित (त्वचारोग), डॉ. प्रदीप मंडल(जनरल), डॉ. दिपक चौहान(दंतरोग), डॉ. शिल्पा टिपले( स्त्रीरोग), आणी समृद्धी वासनीक (बालरोग) यांनी सुद्धा रुग्णांचे अतीशय योग्य पद्धतीने रोगनिदान केले. या कार्यक्रमास उपस्थित ग्रामीण भारत महिला गृह उद्योग मंडळाचे संचालक श्री. अशोक अंबागडे, यांनी जनतेला आव्हाण केले की, आरोग्य हि आपली खुप मोठी संपत्ती आहे, आपल्या आरोग्याची वेळोवेळी काळजी करा व तसेच निरनिराळ्या रोगांविषयी काही आपल्यामध्ये गैरसमज असल्यास डॉक्टरांचा सल्ला आवर्जुन घ्या.असे जनतेला थोडक्यात संबोधले, उपस्थित ग्रामिण भारत महीला गृह उद्योग मंडळातर्फे सहमान्यवर मा.प्रशिल भेसेकर, किसन बोबडे,सागर कातकर,सौरभ मादासवार तसेच इतर स्नेही मा. हेमंत ञिवेदी (संचालक,परिवार विकास फांऊडेशन) मा.महेश भंडारे, मा.शुभम शुल्का ग्रामीण भारत महीला गृह उद्योग मंडळ आणि परिवार विकास फांऊडेशन यांच्या संकल्पनेतुन सदर शिबीराचा कार्यक्रम संपन्न झाला.