राजुरा येथे पार पडली राज्यस्तरीय वादविवाद स्पर्धा

0
976

राजुरा येथे पार पडली राज्यस्तरीय वादविवाद स्पर्धा

राज्यातील २० महाविद्यालयातील ४० स्पर्धकांचा समावेश

विशाल खर्चवाल प्रथम तर अनिकेत दुर्गे द्वितीय पुरस्काराचा मानकरी

श्री शिवाजी महाविद्यालय व माजी विद्यार्थी संघटनेचे यशस्वी आयोजन

 

राजुरा : श्री शिवाजी कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय व माजी विद्यार्थी संघटनेच्या वतीने राज्यस्तरीय वादविवाद स्पर्धेचे नुकतेच आयोजन केले होते. राज्यातील २० महाविद्यालयातील ४० स्पर्धकांनी या वादविवाद स्पर्धेत सहभाग घेतला होता.

यावेळी वादविवाद स्पर्धेचे उद्घाटन पत्रकार आनंद आंबेकर यांनी केले. अध्यक्ष म्हणून माजी प्राचार्य दौलतराव भोंगळे, प्रमुख पाहुणे म्हणून साजिद बियाबानी, शिवाजी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस. एम. वारकड, उपप्राचार्य राजेश खेरानी, प्रा. संतोष देठे, माजी विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष अविनाश दोरखंडे, बादल बेले व मान्यवर उपस्थित होते. यावेळी प्रथम पुरस्कार विशाल खर्चवाल (पाच हजार रुपये) इंपिरियल क्लासेस राजुरा कडून तर स्मृती चिन्ह संदीप खोके तर्फे द्वितीय पुरस्कार अनिकेत दुर्गे (चार हजार रुपये) आणि स्मृती चिन्ह स्व. काशिनाथ केशवराव ढुमने स्मृती प्रित्यर्थ किरण ढुमने एल.आय.सी. डेव्हलपमेंट ऑफिसर यांचे तर्फे तृतीय पुरस्कार लोकेश सोनवणे (तीन हजार रुपये) आणि स्मृती चिन्ह आर. के. बुक डेपो राजुरा कडून तर प्रोत्साहन पर प्रथम प्रतीक्षा वासनिक (एक हजार रुपये) आणि स्मृती चिन्ह प्रभारत्न होम डेकोरे, राजुरा केतन जुनघरे यांचे तर्फे, प्रोत्साहन पर द्वितीय आकाश कडूकर (एक हजार रुपये) व स्मृती चिन्ह रमेश झाडे ग्राम पंचायत सदस्य रामपूर यांचे कडून प्रोत्साहन पर तृतीय पुरस्कार आशुतोष तिवारी (एक हजार रुपये) व स्मृती चिन्ह आई ड्राईव्हींग स्कुल तर्फे अमोल राऊत यांचे कडून वादविवाद स्पर्धेतील पुरस्कार स्मृतिचिन्ह व प्रमाणपत्र व रोख उपस्थित मान्यवरांच्या हस्ते विजयी स्पर्धकांना प्रदान करण्यात आला.

यावेळी वादविवाद स्पर्धा महत्वाची असल्याचे मत मान्यवरांनी बक्षीस वितरण प्रसंगी व्यक्त केले. स्पर्धेचे परीक्षण डॉ. प्रशांत ठाकरे, आनंद आंबेकर व गणेश चूंचूवार यांनी केले. प्रास्ताविक बादल बेले यांनी केले. संचालन प्रा. सुयोग साळवे यांनी तर आभार प्रा. देविदास कुईटे यांनी मानले. स्पर्धेच्या यशस्वीतेकरीता नागनाथ मनुरे, संदीप बोधे, शरद लांडे, हरी लेडांगे, प्रदीप वासाडे, राहुल थोरात, असिफ सय्यद, मोहन कलेगुरवार, विशाल शेंडे, भारत भोयर, अमोल राऊत, तमन्ना शेख, विद्या रागीट, जोत्सना झिलपे, मंजुषा नगराळे, राधा दोरखंडे, प्रशिक जगताप व श्री शिवाजी महाविद्यालयाचे विद्यार्थी व माजी विद्यार्थी संघटनेच्या विद्यार्थ्यांनी सहकार्य केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here