विहिरगाव येथील तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या
राजुरा : तालुक्यातील विहिरगाव येथे 23 वर्षीय तरुणाने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली. हि घटना आज 4 वाजता उघडकीस आली.
निलेश बाबूलाल नगराळे असे तरुणाचे नाव असून तो राजुरा येथे शिवाजी महाविद्यालयात द्वितीय वर्षाला होता. मृतकाचे आईवडील वरोरा जवडील डोंगरगाव चिक्कली येथे राहतात. तो आजोबासह (कचरू वनकर) विहिरगाव येथे राहत होता. आजोबा रोजगार हमी योजनेच्या कामावर गेले आता घरी कोणी नसल्याने सुसाईड नोट लिहून स्वतःला गळफास लावून घेतला. त्याचे आजोबा 4 वाजता घरी आल्यानंतर ही घटना उघडकीस आली. पुढील तपास विरुर पोलीस करत आहे.