श्री साई स्पोर्टिंग क्लब च्या उदघाटनामध्ये आम आदमी पार्टी घूग्घुस ची मोठी घोषणा – अमित बोरकर
काल दिनांक 07 जानेवारी 2022 ला श्री साई स्पोर्टिंग क्लब द्वारा बहादे प्लॉट अमराई वार्ड क्र.01 इथे आयोजित करण्यात आलेल्या व्हॉली बॉल स्पर्धेमधे आम आदमी पार्टी शहर अध्यक्ष अमित बोरकर यांना प्रमुख पाहुणे म्हणून बोलविण्यात आले.यावेळी संबोधिताना अमित बोरकर यांनी संपूर्ण पालक वर्गांना सांगितले की ज्याप्रकारे शिक्षण हा जीवनाचा महत्त्वाचा भाग आहे त्याप्रमाणेच खेळ सुद्धा एक महत्त्वाचा घटक आहे आणि या खेळा मार्फत सुद्धा आपण आपले भविष्य घडवू शकतो असा संदेश देत. सोबतच आम आदमी पार्टीच्या अध्यक्षा नाते एक मोठी घोषणा सुद्धा केली की जर येणाऱ्या प्रथम घूग्घुस नगरपरिषद निवडणुकीमध्ये आम आदमी पार्टी सत्तेमध्ये बसली तर घूग्घुस मधे दरवर्षी टॉप 5 खेळांना आम आदमी पार्टी द्वारा आयोजित करण्यात येईल व ज्याचे प्रथम बक्षीस 2 लाख रुपये असतील आणि आम आदमी पार्टी द्वारा भव्य स्वरूपाचे स्पोर्ट्स क्लब चे निर्माण करण्यात येणार ज्यामुळे रोजगार निर्माण होईल व खेळाडूंना खेळा प्रती प्रोत्साहन सुद्धा मिळेल व घूग्घुस शहरातील खेळ प्रेमींना राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवर जाण्याची एक संधी निर्माण होईल.
ज्याप्रमाणे दिल्लीचे मुख्यमंत्री तथा आम आदमी पार्टीचे संस्थापक अध्यक्ष मा. अरविंद जी केजरीवाल नागरिकांच्या मूलभूत अधिकारांवर जाहीरनामा बनवून दिल्लीमध्ये उत्कृष्ठ कार्य केले त्याप्रमाणेच येणाऱ्या काळामध्ये आम आदमी पार्टी घूग्घुस सुद्धा शहरातील नागरिकांसाठी घोषणापत्र जाहीर करेल ज्यामध्ये नागरिकांना मूलभूत सुविधा शिक्षण, स्वास्थ्य, रोजगार, सोबतच प्रदूषणावर नियंत्रण या मुख्य घोषणा राहील असा इशारा आम आदमी पार्टी शहर अध्यक्ष अमित बोरकर यांच्या द्वारे देण्यात आला.
त्यावेळी प्रमुख उदघाटक काँग्रेस शहर अध्यक्ष राजू रेड्डी, काँग्रेस किसान जिल्हाध्यक्ष रोशन पचारे, कामगार नेते सय्यद अनवर, जयंता जोगी, पारिश डांगे, राजू पथाडे, योगेश पाझारे व अन्य उपस्थित होते. कार्यक्रमाचे आयोजन श्री साई स्पोर्टिंग क्लब चे अध्यक्ष आशिष जंगम द्वारा आयोजित करण्यात आले.