कोरपना तालुक्यातील आवाळपूर बीबी नांदाफाटा परिसरात चिकणगुणिया, डेंग्यूचा प्रादुर्भाव!
कोरोना काळात चिकणगुणिया व डेंग्यू मुळे नागरिकांचे आरोग्य संकटात
परिस्थिती हाताबाहेर जाण्याअगोदर “आरोग्य विभागाने” लक्ष देणे गरजेचे
काय आहेत डेंग्यू चिकणगुणिया आजारातील फरक ? माहितीसाठी बातमी पूर्ण वाचा
कोरपना-नितेश शेंडे
जिल्ह्यात कोरोनाचा कहर सुरू असताना कोरपना तालुक्यातील आवाळपुर, नांदाफाटा, बिबी यासारख्या मोठ्या गावात डेंग्यू आणि चिकणगुणिया या आजाराचे संकट घोगावंत असून या परिसरातील वाढते रुग्ण ही चिंतेची बाब आहे. ग्रामपंचायत प्रशासनाअंतर्गत असणाऱ्या अस्वच्छतेने साथीच्या रोगांना असलेले निमंत्रण नागरिकांच्या ही जीवावर उठणार आहे.
एकीकडे कोरोनाचा उद्रेक आणि दुसरीकडे साथीच्या आजाराचे वाढते प्रमाण यामुळे लोकांवर दुहेरी संकटं आलेले आहे. अद्याप चिकणगुणिया आणि डेंग्यू च्या रुग्णाच्या संख्येची निश्चित माहिती मिळाली नसली तरी गावागावात अनेक ठिकाणी या साथीचे रुग्ण दिसून येत आहे. त्यामुळे नागरिकांनी आता अधिक काळजी घेणं गरजेचं आहे. ठिकठिकाणी साचलेल्या डबक्यांमध्ये डासांची उत्पत्ती होत असून मलेरियाचा सुद्धा धोका वाढण्याची शक्यता आहे.त्यामुळे वेळीच आवश्यक ती सावधानी बाळगणे गरजेचे असून आरोग्यविभागाने सुद्धा आता लक्ष देणे गरजेचे आहे.
चिकनगुनिया आणि डेंग्यूमधील फरक
जरी दोन्ही रोगात जुळणारी लक्षणे सारखिच असली तरी त्यामध्ये काही महत्त्वाचे फरक आहे.
डेंग्यू आणि चिकनगुनिया चा संसर्ग एकाच प्रकारच्या मच्छराने होतो परंतु वेगवेगळ्या व्हायरसमुळे होतो. टोगविरीडे अल्फाव्हायरसमुळे चिकनगुनिया होतो,परंतु डेंगूच्या तापास फ्लेविविरिडे फ्लाविव्हायरस जबाबदार आहे.
गेल्या काही वर्षांत डेंगूचा ताप चिकनगुनियापेक्षा जास्त सामान्य आणि धोकादायक झाला आहे परंतु चिकनगुनियाशी संबंधित सान्ध्यांच्या वेदना बरेच वर्षे टिकू शकतात.
डेंग्यूची लक्षणं संसर्ग झाल्यानंतर 3-4 दिवसांच्या आत दिसून येतात आणि औषधोपचार आणि विश्रांतीसह सुमारे 3-4 आठवड्यांत कमी होतात. चिकनगुनियाच्या लक्षणांची सुरवात अचानक 2 ते 4 दिवसांच्या आत ताप येतो आणि काही आठवड्यात किंवा महिन्यांत कमी होण्यास सुरुवात होते.
चिकनगुनियाच्या प्रारंभिक लक्षणांमध्ये ताप, सांधे आणि स्नायूचा वेदना, डोळ्यातील संसर्ग आणि पुरळ यांचा समावेश असतो तर डेंग्यू मध्ये सुरुवातीला ताप, वेदना आणि डोकेदुखी ही लक्षणे समाविष्ट असतात.
चिकनगुनियामध्ये, धड आणि हात यावर पुरळ येते, तर डेंग्यूमध्ये ती हात आणि चेहर्यावर येते.
चिकनगुनियामध्ये सांधे दुखी हात, मनगट, पावल आणि पाया मध्ये अनुभवायला लागते, तर डेंग्यूमध्ये खांद्यावर आणि गुडघ्यात अनुभवायला लागते.
सुरक्षित रहा ।। काळजी घ्या ।। आणि आजारापासून आपला बचाव करा ।।