विजय शौर्य स्तंभ प्रतिकृती लोकार्पण सोहळा थाटात संपन्न

0
1943

विजय शौर्य स्तंभ प्रतिकृती लोकार्पण सोहळा थाटात संपन्न

 

बल्लारपूर, 1 जाने. : भीमा-कोरेगाव लढाई ही महाराष्ट्राच्या पुणे जिल्ह्यातील कोरेगाव भीमा या गावात भीमा नदीच्या काठावर झालेली एक ऐतिहासिक लढाई आहे. यादिवशी या ठिकाणी राज्यभरातून अनुयायी मानवंदना देण्यासाठी येत असतात. याच पार्श्वभूमीवर बल्लारपूर येथे शौर्य विजय स्तंभाची प्रतिकृती निर्माण करण्यात आली. त्या प्रतिकृतीचा आज लोकार्पण सोहळा मोठ्या थाटात संपन्न झाला. यावेळी विजय शौर्य स्तंभाला हजारोच्या संख्येने उपस्थित अनुयायांतर्फे अभिवादन करण्यात आले.

या लोकार्पण सोहळ्याला विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. आज सकाळी ८ वाजता डॉ. बाबासाहेब आंबेडकर व छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पूर्णाकृती पुतळ्याला मानवंदना देऊन भिक्खूसंघासह जय भीम चौक पर्यंत भीमसैनिकांची पदयात्रा काढण्यात आली. 10 वाजता विजय शौर्य स्तंभाला अभिवादन व लोकार्पण सोहळा संपन्न झाला. 11 वाजता उपस्थितांना भोजनदानाचा कार्यक्रमाचा पार पडला. तसेच स्नेहभोजनाची सर्व जबाबदारी बल्लारपूरचे नरेश गेडाम व छावा फाऊंडेशन राजुरा तर्फे अमोल राऊत यांनी यशस्वीपणे सांभाळली. सुरेंद्र फुसाटे, धनराज उमरे, जय खोब्रागडे, सिद्धार्थ खडसे, रवी बावणे, रवी झाडे, नूतन ब्राह्मणे, संजय कातकर, अमोल मालखेडे आदींनी सहकार्य केले. त्यानंतर 12 वाजता भदंत ज्ञानज्योति यांचे उदघाटन पर मार्गदर्शन झाले.

दुपारी 1 वाजता व्याख्यान मालेचे अयोजन करण्यात आले होते. यात स्वातंत्र्यपूर्व काळातील व आजच्या स्त्रियांची परिस्थिती आणि त्यांच्या पुढील आव्हाने व उपाय या विषयावर डॉ. अभिलाषा गावतुरे यांचे व्याख्यान झाले. आजचा युवक आणि त्यांच्या पुढील भविष्यातील आव्हाने व उपाय या विषयावर प्रा. जावेद पाशा सर यांचे व्याख्यान तर प्रा. दिलीप चौधरी यांचे भीमा कोरेगाव शौर्याची यशोगाथा व आजची प्रसंगीकता या विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. तर सायंकाळी 5 वाजेपासून झाकीर हुसैन ताजी यांची कव्वाली आयोजित करण्यात आली आहे.

सदर कार्यक्रमाला बल्लारपूर शहरासह जिल्ह्यातील अनेक भीमसैनिकांची हजारोच्या संख्येने उपस्थिती होती. उपस्थितांनी विजय शौर्य स्तंभ प्रतिकृतीला मानवंदना अर्पण केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here