ग्रा.पं.च्या पुढाकाराने प्रेमी अडकले विवाह बंधनात
कोठारी, राज जुनघरे : तब्बल दोन वर्ष चिकार प्रेमात पडलेल्या प्रेमीयुगुलांची गोंडपिपरी तालुक्यातील कन्हाळगाव अभयारण्याच्या कुशीत वसलेल्या गणपुर – कन्हाळगाव गट ग्रामपंचायतीने लगीन गाठ बांधली. ग्रामपंचायतीचा पुढाकार आणि तंटामुक्त समितीने कर्तव्य बजावत नव वधुवरांच्या पालका समक्ष कोठारी येथील महिपालसिंग बाबा टेकडी येथे विवाह सोहळा पार पडला.
गणपुर निवासी अजय अरुन नेवारे आणि अंकिता गुरुदास कुमरे हे दोघेही मागील दोन वर्षांपासून एकमेकांच्या प्रेमात पडले होते. याची चाहुल घरच्यांना लागताच ग्रामपंचायत व तंटामुक्त समितीने पुढाकार घेऊन सरपंच प्रदीप कुडमेथे, पोलिस पाटील बंडू आलाम कन्हाळगाव, पोलिस पाटील मंगला मडावी गणपुर, तं.मु. स.अध्यक्ष महादेव आत्राम यांच्या उपस्थितीत महिपाल सिंग बाबा टेकडी मंदिरात विवाह लावून दिला. यावेळी संजय सुरपाम, किसन नेवारे, पुरब मडावी, अतूल पेन्दाम , विनोद मेश्राम, स्वप्निल राऊत, शशीकांत नेवारे, अर्चना नेवारे, अरुन नेवारे, ललिता नेवारे, सुनिता नेवारे, संतोष मेश्राम आदीच्या उपस्थित विवाह सोहळा पार पडला.