ग्रामपंचायतमध्ये ग्रामसेवक व इतर कर्मचाऱ्यांची हजेरी नोंदविण्यासाठी फेस स्कॅनर/बायोमेट्रिक मशीन लावण्यात यावी
युवशक्ती ग्रामविकास संघटन जिल्हा चंद्रपूरची निवेदनातून मागणी
चंद्रपूर : महाराष्ट्रातील प्रत्येक गावातील ग्रामसेवक (सचिव) हे ग्रामपंचायत कार्यालयात वेळेवर हजर न राहत असल्याने सामान्य जनतेला नाहक त्रास सहन करावा लागत आहे. याकरिता ग्रामपंचायतमध्ये ग्रामसेवक व इतर कर्मचाऱ्यांची हजेरी नोंदविण्यासाठी फेस स्कॅनर/बायोमेट्रिक मशीन लावण्यात यावी. अशी मागणी युवाशक्ती ग्रामविकास संघटनेतर्फे निवेदनातून जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे करण्यात आली.
महाराष्ट्रातील बऱ्याचशा गावात ग्रामसेवक २-३-४ दिवसाआड येतात. कुठेतर महिना महिना दिसत नाही. आले तरी अर्धा एक तास थांबून निघून जातात सामान्य लोकांनी विचारपूस केली असता त्यांच्याकडून उडवाउडवीची उत्तरे मिळतात.
दिनांक ३१ ऑगस्ट १९८८ च्या शासन निर्णयानुसार शासकीय कार्यालयाची वेळ ही सकाळी ९:४५ ते सायं. ६:१५ पर्यंत असते. परंतु अनेक वेळा ग्रामीण भागात सबंधित शासकीय कर्मचारी (ग्रामसेवक) हे वेळेच्या आत परस्पर निघून जात असतात.
ग्रामसेवकांच्या अशा वागण्यामुळे जनतेला याचा खूपच त्रास सहन करावा लागत आहे. जनतेची वेळ सुद्धा वाया जाऊन त्यांना त्यांची कामे वेळेच्या आत करता येत नाही.
यासाठी महाराष्ट्रातील सर्वच ग्रामपंचायतमध्ये ग्रामसेवक व इतर कर्मचाऱ्यांची हजेरी नोंदविण्यासाठी फेस स्कॅनर/बायोमेट्रिक मशीन लावण्यात यावी, अशा आशयाचे निवेदन युवाशक्ती ग्रामविकास चंद्रपूर जिल्हा संघटनेतर्फे जिल्ह्यातील मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद यांना 27 डिसेंम्बर ला निवेदन देण्यात आले.
यावेळी युवाशक्ती ग्रामविकास संगठन, महाराष्ट्र राज्याचे चंद्रपूर जिल्हा उपाध्यक्ष योगेश मूर्हेकर, जिल्हा सचिव पंचशील वाळके, अविनाश उके, आशिष व आदी पदाधिकारी उपस्थित होते.