अपघात ग्रस्त व्यक्तीला सामाजिक कार्यकर्ते संजय पंदीलवार यांची सामाजिक बांधिलकी जोपासत सरळ हाताने मदत
गोर-गरिबांच्या हाकेला धावून जाणारा मोठ्या दिलाचा सामाजिक कार्यकर्ता
चामोर्शी, सुखसागर झाडे
चामोर्शी तालुक्यातील चंदनखेडी येथील मजुर आंध्रप्रदेश येथे कामा करिता गेला असता त्याचा अपघात झाला. अपघातात गेले दोन पाय आष्टी येथील सामाजिक कार्यकर्ते संजय पंदीलवार यांनी सामाजिक बांधिलकी जोपासत संजय पंदीलवार यांना माहिती मिळताच चंदनखेडी वन येथील गोटू करपते रा. चंदनखेडी वय 59 वर्ष दोन्ही पायांनी अपंग असल्यावर सुद्धा पोटाची खळगी भरण्यासाठी आंध्रप्रदेश येते मजूर म्हणून काम करण्याकरता गेला होता. त्यादरम्यान आंध्रप्रदेश मध्ये आपल्या स्व गावी महाराष्ट्र गडचिरोली चामोर्शी तालुक्यातील चंदनखेडी येथे परत येत असताना अपघात झाला. अपघातात त्याचे दोन्ही पाय दुखापत झाल्याची घटना घडली. सदर घटनेची माहिती आष्टी येथील सामाजिक कार्यकर्ते संजय पंदीलवार यांना मिळताच सामाजिक बांधिलकी जोपासत त्यांनी एक ॲम्बुलन्स व स्वतःची गाडी घेऊन सदर घटनास्थळी जाऊन सदर व्यक्तीला ग्रामीण रुग्णालयात आणले. त्यानंतर त्याला गडचिरोली येथे रेफर करण्यात आले.यावेळेस सदर व्यक्ती ची हलाकीची परिस्थिती बघता त्याला उपचार करण्याकरिता अडचण होऊ नये म्हणून सामाजिक बांधिलकी जोपासत संजय भाऊ पंदीलवार यांनी त्याला आर्थिक मदत दिली व सदर व्यक्तीला गडचिरोली जिल्हा रुग्णालयात दाखल करण्याकरिता रवानगी करून दिली.त्याबद्दल त्यांच्या परिवाराने संजयभाऊ पंदीलवार यांचे आभार व्यक्त केले आहे.