महसूल मंत्री बाळासाहेब थोरात ,यांच्या सह प्राजक्त तनपुरे व आमदार विखे पाटील कोरोना ग्रस्त
अहमदनगर
संगमनेर ३१/१२/२०२१
प्रतिनिधी ज्ञानेश्वर गायकर पाटील
महाराष्ट्राचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या सह राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे व आमदार राधाकृष्ण विखे पाटील यांची कोरोना टेस्ट सकारात्मक आल्याने ,आज जिल्ह्यात खळबळ माजली. काँग्रेस चे माजी मंत्री व आता भाजप मध्ये असलेले इंदापूर चे श्री हर्षवर्धन पाटील यांच्या मुलीचा परवा विवाह झाला,या विवाहात हे सर्व जण कोरोना ने ग्रस्त झाले असल्याचे समजते. या आगोदर संसदपटू खासदार सुप्रिया सुळे व परिवार याचं लग्नात कोरोना ग्रस्त झाल्याचे स्पष्ट झाले आहे.स्वतः हर्षवर्धन पाटील ही कोरोना ग्रस्त झाले आहेत
राज्याचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात या नंतर अनेकांच्या संपर्कात आले आहेत. त्यांनी तशी माहिती ही ट्विटर या आपल्या अकाऊंट वर दिली असून, माझ्या संपर्कात आल्याने प्रत्येकाने आपली टेस्ट करून घ्यावी असे ही त्यांनी पुढे म्हंटले आहे. दरम्यान ,महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्याशी संपर्क केला असता त्यांनी आपणास कोणताही त्रास नसून, डॉक्टर यांच्या सल्ल्याने उपचार सुरू आहेत असे सांगितले. नागरिकांनी खूपच काळजी घ्यावी असे विनम्र अहावान त्यांनी जनतेस केले आहे. दरम्यान राज्याचे उप मुख्यमंत्री श्री अजित पवार यांनी राज्यातील जनतेला कडक निर्बंध पाळण्याचे अहवान केले असून, नाहीतर कडक कारवाई सह लॉक डाऊन चा इशारा दिला आहे. दरम्यान राज्यात सर्वत्र प्रचंड थंडी असून, अनेक जण सर्दी ने त्रस्त झाले आहेत. काही दिवस घराबाहेर न पडणे हा महत्त्वपूर्ण सल्ला राज्यातील डॉक्टर व तज्ञ यांनी राज्यातील जनतेस दिला आहे.